Sharad Pawar's Interview : अजित पवारांंच्या पोटातलं आता ओठावर येत आहे; शरद पवारांनी ठेवलं मर्मावर बोट

Lok Sabha Election 2024 : अजित पवार यांनी आज घेतलेली भूमिका तेव्हाच त्यांना घ्यायाची होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही ताब्यात घेण्याची त्यांची इच्छा होती. एखादी इच्छा असणे यात वावगं असं काहीच नाही. पण...
Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad PawarSarkarnama

विजय चोरमारे

Mumbai, 4 May : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात होतं, तेच आता ओठावर येत आहे. माझ्याविरोधात ते ज्या कठोर शब्दांत बोलत आहेत, त्यावरून हे लक्षात येते की, अजित पवार यांना आज घेतलेली भूमिका तेव्हाच त्यांना घ्यायाची होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही ताब्यात घेण्याची त्यांची इच्छा होती. एखादी इच्छा असणे यात वावगं असं काहीच नाही. पण, पक्षाचा अध्यक्ष म्हणून अनेक गोष्टींकडे ध्यान ठेवावं लागतं. राज्य आणि देशाकडे व्यापक दृष्टीने पाहावं लागतं. सगळ्यांशी संवाद ठेवावा लागतो. वाचन करावं लागतं, आता हे सर्व अजित पवार किती करतात, हे मला माहिती नाही. पण, हे सर्व करून राजकारण केले, तर लोकांशी सुसंवाद राहतो. त्यातून यश किती मिळते, हे मी सांगू शकत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवारांनी अजितदादांच्या सध्याच्या भूमिकेवर टिपण्णी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'सकाळ माध्यम समूहा'ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांना अजित पवार तुमच्याविरुद्ध बंड करतात आणि तुमच्यावर कठोर शब्दांत टीका करतात, याकडे तुम्ही कसे बघता? या प्रश्नावर पवारांनी अजितदादांची (Ajit Pawar) सध्याची भूमिकाच विशद केली.

शरद पवार यांच्या राजकीय प्रवासाला एक मे रोजी ६१ वर्षे पूर्ण झाली आहेत, त्याबाबत मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटते, या प्रश्नावर ते म्हणाले, तुम्ही मला साठ वर्षांच्या राजकीय प्रवासाची आठवण करून दिली. पण, साठीनंतरही डोकं अजूनही ठिकाणावर आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. मी सुरुवातीला पुण्यात आणि नंतर राज्यात तरुणांचे संघटन केले. पुढील काळात राज्याच्या मंत्रिमंडळात, प्रशासनात काम करण्याची संधी मिळाली. राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेता अशा विविध पदांवर सुमारे २५ ते ३० वर्षे काम करत आलो. आज मी राज्यसभेत असून नवीन पिढी घडविण्याकडे माझा कटाक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar-Sharad Pawar
Nashik Lok Sabha Constituency : राजाभाऊ वाजेंमुळे नाशिकमध्ये पहिल्यांदाच मराठा-वंजारी मैत्री पर्व

नवे नेतृत्व तयार करून त्या टीमच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोपविण्याचा माझा गेली काही वर्षे विचार होता. त्यातूनच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तो देताना माझ्याकडून एक चूक झाली. या निर्णयानंतर जनतेची काय प्रतिक्रिया येईल, याचा विचार मी केला नव्हता. या निर्णयासंदर्भात मी कोणाशीही बोललो नव्हतो. खरं तर याबाबत मी ज्येष्ठ सहकाऱ्यांशी बोलायला हवं होतं. पण, मी कोणाशीही संवाद न साधल्यामुळे माझ्या राजीनामाच्या निर्णयानंतर काय घडेल, याचा अंदाज आला नाही. त्यानंतर सहकाऱ्यांच्या प्रचंड विरोधामुळे तो राजीनामा मला मागे घ्यावा लागला, असे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतला नसता तर आजचे राजकीय चित्र वेगळे असते, असे वाटते का? यावर उत्तर दिले.

त्यावेळी मी अस्वस्थ झालो होतो

राष्ट्रवादीतील एवढे सहकारी सोडून जातील, असे वाटले होते का? कुणाच्या जाण्यामुळे जास्त आश्चर्य वाटले? यावर पवार म्हणाले, संपूर्ण विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच आश्चर्य वाटले. राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही मोठ्या कष्टाने उभा केला होता, नेते तयार केले होते. ते काम काही एका दिवसात झालेले नव्हते. अनेक वर्षे या लोकांवर आम्ही लक्ष केंद्रीत करून त्यांना विविध ठिकाणी संधी दिली होती. मी स्वतः राज्याच्या कानाकोपऱ्यात दौरे केले, त्या लोकांनीही परिश्रम घेतले, त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस हा मजबूत संघ तयार झाला होता. त्यांना घेऊन एका उद्दिष्टासाठी काम करायचे होते. पण, सत्तेसोबत जाण्याचा विचार जेव्हा सगळ्यांनी मांडला, त्यावेळी मी अस्वस्थ झालो होतो.

Ajit Pawar-Sharad Pawar
Devendra Fadnavis News : निवडणुकीत जे काम करणार नाहीत, त्यांच्याकडे 'विशेष लक्ष' देणार; फडणवीसांची सक्त ताकीद

निवडणुकीत त्रास होईल, असे स्पष्ट दिसत होते

अजित पवारांच्या निर्णयानंतर सुप्रिया सुळेंची खासदारकी धोक्यात आली, असे तुम्हाला वाटते का? त्यावरही पवारांनी सडेतोड उत्तर दिले. अजित पवारांच्या निर्णयानंतर निवडणुकीत त्रास होईल, असे स्पष्ट दिसत होते. लोकशाहीमध्ये त्रास होतोच. पण जनतेत गेल्यावर वास्तव लक्षात येते. बारामतीत अनेक वर्षे आम्ही काम केले असून मतदारांशी सुसंवाद आहे. बारामतीचे राजकारण मी अजित पवारांकडे सोपवून मी राष्ट्रीय पातळीवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे ज्यांच्यावर स्थानिक जबाबदारी दिली, त्यांनी आपल्यापेक्षा वेगळी तर भूमिका घेतली तर त्याची काळजी करायचे कारण नसते. कारण ही जबाबदारी आपणच त्यांच्यावर जाणीवपूर्वक दिलेले असते.

सगळ्याच निवडणुकींमध्यये लक्ष घालणार

आम्ही आता सहकारी सोसायट्यांपासून ग्रामपंचायत, झेडपी, साखर कारखाना सगळ्याच निवडणुकींमध्यये लक्ष घालणार आहोत. कारण नवीन पिढी अस्वस्थ दिसत आहे. पक्षफुटीमुळे तरुण पिढी आणि माझ्या वयाची ज्येष्ठांची फळी अस्वस्थ आहे. राज्यभरात कुठेही गेलो तरी ही तरुणपिढी आमच्यासोबत असते. आता या तरुणपिढीसाठी चांगले नेतृत्व तयार करण्याची जबाबदारी माझी आहे. ती राज्याचीही गरज आहे. त्या दिशेने मी काम करत आहे, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे सगळ्यांना संधी देईल, असेही उत्तर शरद पवार यांनी स्थानिक राजकारणात लक्ष घालणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी काही भाषणांत सांगितले आहे. तुम्ही तसे लक्ष घालणार आहात का? या प्रश्नावर दिले.

Ajit Pawar-Sharad Pawar
Latur Lok Sabha : निलंगेकरांचे काँग्रेसच्या लातूरच्या दोन्ही युवराजांना चॅलेंज; ‘...तर तुमच्या व्यासपीठावर येऊन पाठिंबा देतो’

अजितदादांना त्रास देण्यासाठी काही गोष्टी राखून ठेवल्या

सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा निर्णय अजित पवारांचा की भाजपने त्यांच्यावर सक्ती केली, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षातील काही लोक मला सांगतात की, सुनेत्रा पवार यांना उभं करा, असं त्यांना सांगण्यात आले. अजित पवारांना त्रास देण्यासाठी काही गोष्टी त्यांनी राखून ठेवल्याचे दिसून येते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडा, पक्ष ताब्यात घ्या, त्यांना एकटे पाडा किंवा या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जावा. त्यांचा पराभव करा, या गोष्टी त्यात होत्या, असे दिल्लीतील लोक सांगतात. अमित शाह आणि त्या लोकांचे अजित पवार यांना मार्गदर्शन होते. ते अनेक भाषणांतून मोदी आणि शाह यांच्याशी आपले जवळचे संबंध आहेत, हे सांगतात, त्यातून त्यांच्यातील घरोबा दिसून येतो.

मला काळजी वाटत होती

अजित पवारांच्या निर्णयानंतर मला काळजी वाटत होती. पण, अजित आणि त्यांचे कुटुंबीय सोडले तर आमच्या कुटुंबातील उर्वरीत सर्वजण एकत्र आहोत. पूर्वीप्रमाणे आमचे कुटुंब एकत्र राहिले असते तर आनंद वाटला असता. पण, अनेकदा आपल्याकडूनही काही गोष्टी घडत असतात. त्याचे दडपण आपल्यावर कुणी आणत असेल आणि त्यातून अस्थस्थता किंवा चिंता वाढत असेल तर तडजोडी कराव्या लागतात. तशी तडजोड करण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आली असावी, असे दिसून येते, असेही शरद पवार यांनी पवार कुटुंबात फूट पडत असताना तुमच्या काय भावना होत्या? या प्रश्नावर उत्तर दिले.

Edited By : Vijay Dudhale

Ajit Pawar-Sharad Pawar
Latest Update Beed Lok Sabha : ‘राष्ट्रवादी’च्या बजरंग सोनवणेंनी घेतले शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटेंचे आशीर्वाद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com