Nashik Constituency 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Constituency 2024 : नाशिकची निवडणूक म्हणजे,"भुजबळ यांचं झालं थोडं, पंकजाताईंनी धाडलं घोडं"

Pankaja Munde : छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यातील उमेदवारीच्या स्पर्धेत आता मुंडे यांचेही नाव. सध्या नाशिक मतदारसंघाचे राजकारण म्हणजे, खऱ्या अर्थाने "घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे" अशी स्थिती आहे.

Sampat Devgire

Pankaja Munde News : नाशिक मतदारसंघाचा तिढा महायुतीला सोडवता आलेलं नाही. येथे मंत्री छगन भुजबळ आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यात उमेदवारीचा तिढा आहे. त्यातच आता पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी केलेल्या वक्तव्याने नवी भर पडली. त्यामुळे नाशिक मतदारसंघाचे राजकारण म्हणजे, खऱ्या अर्थाने "घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे" अशी स्थिती आहे. Nashik Loksabha Election.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीड मतदार Beed Constituency संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे विद्यमान खासदार आहेत. प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पक्षाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मतदारसंघातील काही समर्थक नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काल पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे भाषण केले. यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे Pritam Munde यांना विस्थापित होऊ देणार नाही. हवे तर त्यांना नाशिक मतदारसंघातून उमेदवारी देऊ, असे विधान केले. प्रीतम मुंडे यांचा विवाह नाशिकचा डॉक्टर खाडे यांच्याशी झाला आहे. मात्र डॉक्टर खाडे आणि प्रीतम मुंडे दोघेही नाशिकला राहात नाहीत. ते अपवादानेच नाशिकला येत असतात. प्रीतम मुंडे यांचे सासर नाशिक असल्याने त्यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली.

नाशिक मतदारसंघात Nashik Constituency जागा वाटपाचा मोठा गोंधळ आहे. शिवसेनेच्या शिंदे Shivsena Shinde Group गटाला विद्यमान खासदार हेमंत गोडसे Hemant Godse यांच्यासाठी हा मतदारसंघ हवा आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही Ajit Pawar NCP या मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. साताऱ्यातून भारतीय जनता पक्षाने BJP उमेदवार दिल्याने त्या बदल्यात अजित पवार गटाला नाशिकचा मतदारसंघ हवा आहे. भारतीय जनता पक्षाने देखील आपल्या ओबीसी राजकारणाचा भाग म्हणून मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यासाठी या मतदारसंघावर दावा केला आहे. हा सर्व गोंधळ उद्या निवडणूक प्रक्रिया सुरू होत असताना देखील मिटलेला नाही. आता पंकजा मुंडे यांच्या विधानाने त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे नाशिकचे राजकारण खऱ्या अर्थाने "घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे" असे झाले आहे.

या मतदारसंघात शिवसेना Shivsena एकनाथ शिंदे गटाचे खासदार गोडसे यांनी उमेदवारीच्या अपेक्षेने प्रचार देखील सुरू केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गट आला जय महाराष्ट्र करताना उमेदवारीच्या आश्वासनावरच शिंदे गटात प्रवेश केला आहे. या स्थितीत खासदार गोडसे यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची आहे. खासदार गोडसे यांनी गेल्या महिन्याभरापासून आपल्या प्रचार देखील सुरू केलेला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचे राजकारण एका नव्या वळणावर पोहोचले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT