Devendra Fadanvis & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Drug Mafia Lalit Patil : राऊत यांना हवा आहे, ड्रग्जप्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा!

Sampat Devgire

Shivsena Nashik News : नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणात पालकमंत्री दादा भुसे पुरावे नष्ट करत आहेत. हे प्रकरण गंभीर आहे. त्यात राज्य सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही. त्यामुळे यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी केली. (Sanjay Raut criticized Narvekar on MLA disqualification issue)

शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक (Nashik) येथे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर गिरणा साखर कारखान्याबाबत १७८ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा पुनरुच्चार केला.

संजय राऊत यांच्या निशाण्यावर दादा भुसे आहेत. त्यात आता गृहमंत्री फडणवीस व भाजपचे काही आमदारदेखील आले आहेत. त्यामुळे नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

ललित पाटील ससून रुग्णालयात भरती कसा झाला, ससूनच्या डीनला भाजपचा मंत्री व आमदार मार्गदर्शन करत होता, हे सगळे रेकॉर्डवर असून, ललित पाटील याच्याकडून शिंदे सेनेच्या एका मंत्र्यासह आमदारांनीही खोके घेतले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून फार अपेक्षा नाहीत. ते केवळ वेळकाढूपणा करीत आहेत. त्यामुळे त्यांचा हेतू जनतेला कळून चुकला आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.

या वेळी खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत वेळकाढूपणा होत असल्याचे लपून राहिलेले नाही. हे सर्व महाराष्ट्राला कळून चुकले असल्याचे सांगितले.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपात्रतेबाबत फारशी अपेक्षा नाही. ते फक्त वेळकाढूपणा करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही निर्णय झालेला नाही. विधानसभा अध्यक्ष संविधान व कायद्याचा मुडदा पाडत आहेत, असा गंभीर आरोप राऊत त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT