Trible Reservation : आमदारांनो राजीनामे देऊन घरी बसा!

Trible leaders asks MLA to resigne and sit st home-एकमेकांचे तोंडही न पाहणारे आमदार धनगर आरक्षणाच्या विरोधासाठी आले एका व्यासपीठावर
Nitin Pawar & J. P. Gavit
Nitin Pawar & J. P. GavitSarkarnama
Published on
Updated on

Nashik Trible march News : आरक्षण वाचविण्यासाठी आज आदिवासी समाजाने नाशिकमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे धरले. या वेळी नेत्यांनी आमदारांना आरक्षण वाचवता येत नसेल, तर राजीनामे देऊन घरी बसा, असा इशारा दिला. (Trible community demonstrate there strength in Nashik against Dhangar community reservation)

धनगर समाजाने आदिवासी (Trible community) जमाती वर्गात आरक्षण मागितल्याने त्याला विरोध वाढतच चालला आहे. आदिवासी विकास परिषदेने आज राज्य सरकारच्या (Maharashtra) विरोधात नाशिकमध्ये (Nashik) हजारो आदिवासींसह शक्तिप्रदर्शन केले.

Nitin Pawar & J. P. Gavit
Drug Mafia Lalit Patil : नाशिकच्या नेत्यांना ड्रग्ज प्रकरणातील आरोपींविषयी खरंच प्रेम आहे का?

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याच्या विविध भागातून हजारो आदिवासी नागरिक या मोर्चात सहभागी होण्यासाठी शहरात जमले होते. पंचवटी भागातील तपोवन येथून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा शहरातील विविध मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जमले होते. या वेळी आदिवासींनी घोषणांनी हा परिसर दणाणून सोडला.

या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी विकास परिषदेने केले. त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते जे. पी. गावित, भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार या तीन नेत्यांनी आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात राजकारण केले. एकमेकांचे तोंडही न पाहणारे हे नेते अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण देऊ नये, कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश रद्द करावा यांसह विविध मागण्यांसाठी एकत्र आले होते.

या वेळी विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण महामटे, आमदार हिरामण खोसकर, मंजुळा गावित, माजी आमदार धनराज महाले आदींसह विविध लोकप्रतिनिधी मोर्चात सहभागी झाले होते. समितीचे राम चौरे, संजय दाभाडे, शिवाजी ढवळे आदींसह विविध पदाधिकारी, सरपंच व लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.

Nitin Pawar & J. P. Gavit
Drug Mafia Lalit Patil : नाशिकच्या नेत्यांना ड्रग्ज प्रकरणातील आरोपींविषयी खरंच प्रेम आहे का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com