Drug Mafia Lalit Patil : ठाकरे गटाचेच ललित पाटीलशी संबंध आहेत!

Sushama Andhare made a baseless allegation on Dada Bhuse-शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचे अंधारे यांच्या विरोधात आंदोलन
Shivsena Agitation at Nashik
Shivsena Agitation at NashikSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Nashik News : शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गटावर आरोप करतात. यातील कोणताही आरोप खरा नसतो. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावरील आरोपदेखील निराधार आहेत, अशी टीका पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली. (Shivsena (Shinde Group) party workers agitation against Sushma Andhare)

शिवसेना (Shivsena) (एकनाथ शिंदे) (Eknath Shinde) गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) (Uddhav Thackeray) नेत्या सुषमा अंधारे यांचा निषेध करीत आंदोलन केले. या वेळी (Nashik) त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

Shivsena Agitation at Nashik
Trible Reservation : आमदारांनो राजीनामे देऊन घरी बसा!

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे गटाचे मंत्री दाद भुसे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोप ललित पाटील यांच्याशी संबंध आहेत. त्यांनी पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली, असा आरोप केला होता. त्याचा शिंदे गटातर्फे निषेध करण्यात आला.

याबाबत ठाकरे गटाच्या नेत्यांबरोबर संशयि पाटील यांचे काहीही संबंध नसताना या विषयाला राजकीय वळण देण्यात येत आहे. याबाबत आरोपांची राज्य शासनाने चौकशी करून उत्तर द्यावे, असे बोरस्ते म्हणाले.

ते म्हणाले, पुरावा नसताना सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याने सुषमा अंधारे यांनी नाशिककरांची जाहीर माफी मागावी. या उलट ठाकरे गटाच्या नेत्यांबरोबर ललित पाटीलचे फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत. ठाकरे गटाचे नेते व पाटील यांच्यात काय संबंध आहेत, याबाबतही अंधारे यांनी उत्तर द्यावे.

Shivsena Agitation at Nashik
Maratha Vs OBC Reservation : आरक्षणाचा तिढा! मनोज जरांगे-छगन भुजबळांतील वाद चिघळणार?

या वेळी सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी जोडे मारत आंदोलन केले. या वेळी महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सुवर्णा मटाले, अस्मिता देशमाने, युवासेना विस्तारक योगेश बेलदार, उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, महेश जोशी, शशिकांत कोठुळे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, विधानसभाप्रमुख बाबूराव आढाव, रोशन शिंदे, प्रताप मेहरोलिया, दीपक मौले, नगरसेवक सूर्यकांत लवटे, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे आदी उपस्थित होते.

Shivsena Agitation at Nashik
Drug Mafia Lalit Patil : नाशिकच्या नेत्यांना ड्रग्ज प्रकरणातील आरोपींविषयी खरंच प्रेम आहे का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com