Akshay Kardile win Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Akshay Kardile win : वाढदिवशीच अक्षय कर्डिलेंना ‘विजयाची’ भेट; 'राहुरी' पोटनिवडणुकीत मतदारांचं 'रिटर्न गिफ्ट'!

Voters in Rahuri delivered a decisive birthday win to BJP candidate Akshay Kardile, calling it a “return gift” on his special day : राहुरी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना वाढदिवशीच, मतदारांनी मोठा विजय मिळवून दिला आहे.

Pradeep Pendhare

Rahuri bypoll result : राहुरी पोटनिवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची माघार, शरद पवार राष्ट्रवादीने तडजोड करत गोविंद मोकाटे यांच्या रूपाने दिलेला उमेदवार, शरद पवार राजकारणात कोणताही चमत्कार करतील, याचा नेम नाही, अशा राजकीय वातावरणात फक्त वडिलांची पुण्याईच्या जोरावर नवखे अक्षय कर्डिले पोटनिवडणुकीला समोरे गेले अन् आता विजयावर शिक्कामोर्तब केला.

आठव्या फेरी अखेर अक्षय कर्डिले यांना 90 हजार 638 मते मिळाली असून, प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांच्या जवळ कुठेही नाहीत. 85 हजार 635 मतांची निर्णायक विजयाची आघाडी घेतली आहे. मत मोजणीच्या आता नऊ फेऱ्या बाकी राहिल्या आहेत. अक्षय कर्डिले यांचा हा विजय, त्यांच्या वाढदिवशी झाला असून, मतदारांनी त्यांना विजय करत 'रिटर्न गिफ्ट' दिले आहे.

भाजपचे (BJP) दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे अकाली निधन झाले. या पार्श्वभूमीवर राहुरी मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले हे निवडणुकीच्या मैदानात उतरले. ही निवडणूक तशी प्रतीकात्मक! पण निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढवली जावी, असा अलिखित नियम असतो. पण नवख्या अक्षय कर्डिले यांनी ही निवडणूक या नियमापलीकडे जात भावनात्मकपद्धतीने लढवली. विरोधकांना एकही टीका केली नाही. फक्त वडिलांनी मतदारसंघात उभारलेल्या व्यक्तिगत संपर्कावर लढली.

अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांनी मतमोजणीच्या पोस्टल फेरीपासून मताधिक्य कायम ठेवली. या मताधिक्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा, वंचितचा आणि बंडखोर उमेदवार कोठेच नव्हते. म्हणजेच, एकतर्फी मताधिक्य घेण्यात अक्षय कर्डिलेंना कुणीच रोखू शकले नाही.

अक्षय कर्डिले यांचा निवडणुकीतील प्रचार यंत्रणा सांभाळण्यासाठी पडद्याआड मोठी ताकद होती. भाजपबरोबर अक्षय कर्डिले यांची व्यक्तिगत यंत्रणा कार्यरत होते. या यंत्रणेला बळ मिळाले ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या यंत्रणेचे. त्यामुळे प्रचारात कुठेही उणिव राहिली नाही.

अक्षय यांच्या भावनात्मक प्रचाराला मतदारांची साथ

अक्षय कर्डिले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर अख्या निवडणुकीत टीका केली नाही. मतदारांवर वडिलांनी केलेलं प्रेम टिकवून ठेवण्यासाठी आपण निवडणुकीला समोरे जात आहोत, असे ते सुरवातीपासून सांगत राहिले. यातून अक्षय कर्डिलेंभोवती चांगले भावनात्मक वातावरण निर्माण झाले.

पाथर्डीचे 'ती' गाव ठरली निर्णायक

राहुरी विधानसभा मतदारसंघ तसा किचकट, हा मतदारसंघ संभाळताना, दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनी स्वतःची वेगळी कमांड कायम ठेवली होती. राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्यात हा मतदारसंघ विखुरलेला आहे. यातून पाथर्डीतील 39 गावांचा या मतदारसंघात समावेश होता. तिथला मतदार हा भाजपचा हिंदुत्ववादी असा मतदार आहे. त्याला अक्षय कर्डिले यांनी भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून जवळ केलं. आमदार मोनिका राजळे या स्वतः तिथं प्रचारात उतरल्या होत्या. त्याचा फायदा अक्षय कर्डिलेंना झाला.

संग्राम जगतापांची मेहुण्यासाठी जोरदार फिल्डिंग

नगर तालुका हा अहिल्यानगर शहराला जोडला गेला आहे. अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघावर अक्षय कर्डिले यांचे मेहुणे अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे आहे. आमदार संग्राम जगताप यांचा शहरासह नगर तालुक्यात काही भागात चांगला प्रभाव आहे आणि दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांनी होमग्राऊंड नगर तालुक्यात उभी केलेली कार्यकर्त्यांची फौज एकसंघ राहिल्याचा फायदा अक्षय कर्डिलेंना झाला.

तनपुरेंबरोबर भाजपची शिष्टाई यशस्वी

राहुरीत मात्र अक्षय कर्डिलेंसमोर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आव्हान होते. तसे ते तनपुरेंनी देखील निर्माण केले होते. परंतु भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शिष्टाई यशस्वी ठरली आणि तनपुरे यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे अक्षय कर्डिले यांना राहुरीतूनही निवडणूक सोपी झाली.

अक्षय कर्डिलेंना मतदारांकडून विजयाचे गिफ्ट

असे असताना देखील अक्षय कर्डिलेंनी कोणतीही रिस्क घेतली नाही. व्यक्तिगत संपर्कावर भर देताना, पडद्यामागून हलविण्यात येणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर ते बारकाई लक्ष ठेवून होते. यासाठी त्यांना त्यांच्या बहि‍णींची मोठी साथ मिळाली. अक्षय कर्डिलेंच्या भावनात्मक आवाहनाला मतदारांनी देखील प्रतिसाद दिला आणि त्यांना आज विजयाचे रिटर्न 'बर्थ-डे' गिफ्ट दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT