Rahuri By-Election : मोठी बातमी! राहुरी पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर! अक्षय कर्डिले मैदानात!

BJP Candidate Akshay Kardile: भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अकास्मत निधनाने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
BJP announces Akshay Kardile for Rahuri by-election
BJP announces Akshay Kardile for Rahuri by-electionSarkarnama
Published on
Updated on

Rahuri by-election candidate announcement BJP: आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाल्याने निवडणूक आयोगाने राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 23 एप्रिलला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

दरम्यान, भाजपने राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अक्षय कर्डिलेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला असून विरोधी पक्ष आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. भाजपमध्ये जात ते उमेदवारी मिळवतील अशी चर्चा देखील होती. मात्र, भाजपने अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

शिवाजी कर्डिले यांच्या घरात उमेदवारी दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शरद पवारांचा राष्ट्रवादी या निवडणूकीबाबत काय निर्णय घेणार यावर विरोधी पक्षांची भूमिका अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे.

BJP announces Akshay Kardile for Rahuri by-election
Assembly Byelection : अजितदादा अन् शिवाजी कर्डिलेंचे उत्तराधिकारी कोण? बारामती, राहुरीतील पोटनिवडणुकीच्या घोषणेचा मुहूर्त ठरला

राहुरीसोबत बारामतीमध्ये देखील पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या येथे निवडणूक लढणार आहेत. अजित पवारांच्या अपघाती निधनाने येथे पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, येथे देखील बिनविरोध निवडणूक करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून आवाहन करण्यात आले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले आहे.

निवडणूक कार्यक्रम

निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. तर, चार मे रोजी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, बारामती आणि राहुरीमध्ये निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून हलचाली करण्यात येत आहेत.

BJP announces Akshay Kardile for Rahuri by-election
BJP Leader On Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीबाबत भाजप नेत्याचा मोठा दावा; ‘...पण; सर्वच निवडणुका बिनविरोध होतील, असं नाही’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com