Baramati and Rahuri By Election Result Live Update : सुनेत्रा पवार यांना सर्वाधिक 1 लाख 21 हजार 855 मतांची आघाडी

Baramati and Rahuri By Election BJP NCP NCPSP VBA ShivsenaUBT Maharashtra Breaking LIVE Updates on 4 May : बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल आज चार मे रोजी जाहीर होत असून, राहुरीत भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादीमध्ये लढत आहे. या निकालाचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर.....
Baramati and Rahuri By Election Result Live
Baramati and Rahuri By Election Result LiveSarkarnama

Baramati and Rahuri By Election 2026 Result : सुनेत्रा पवार यांना सर्वाधिक 1 लाख 21 हजार 855 मतांनी आघाडी

राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 76 हजार 162 मतांची आघाडी घेतली आहे. बारामतीत सुनेत्रा पवार यांनी मतांची 1 लाख 21 हजार 855 मतांनी आघाडी घेतली आहे. बारामती आणि राहुरी इथली पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या फेऱ्या अंतिम टप्प्यात सुरू झाल्या आहेत. लवकरच उमेदवारांच्या विजयाची घोषणेची शक्यता आहे.

Baramati and Rahuri By Election 2026 : सुनेत्रा पवार यांना एक लाख, तर कर्डिले 66 हजार मतांनी आघाडीवर

राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना चौदाव्याच्या फेरीअखेर 66 हजार 107 मतांची आघाडी घेतली आहे. बारामतीत सुनेत्रा पवार यांनी मतांची 1 लाख 3 हजार 709 मतांनी आघाडी घेतली आहे. बारामती आणि राहुरी इथली पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजयाच्या दिशेने घौडदौड कायम ठेवल आहे.

Baramati and Rahuri By Election Result : सुनेत्रा पवार यांना 95 हजार, तर कर्डिले 55 हजार मतांनी आघाडीवर

राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना बाराव्या फेरीअखेर 55 हजार 767 मतांची आघाडी घेतली आहे. बारामतीत सुनेत्रा पवार यांनी मतांची 95 हजार 652 मतांनी आघाडी घेतली आहे. बारामती आणि राहुरी इथली पोटनिवडणूक एकतर्फी होणार असल्याचे संकेत होते.

Baramati and Rahuri By Election Result Update : सुनेत्रा पवार यांना 95 हजार 552, तर कर्डिले यांची 49 हजार 956 मतांची आघाडी

बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 95 हजार 552 मतांनी आघाडीवर असून, राहुरीत अक्षय कर्डिले हे 49 हजार 956 मतांनी आघाडीवर आहे. दोन्ही उमेदवार हे पोस्टल मतदानापासून आघाडीवर आहेत. दोन्ही ठिकाणी 11 व्या फेरीपर्यंत मतमोजणी झाली आहे.

Baramati and Rahuri By Election Result Update : कर्डिलेंना 44 हजार, तर पवार 78 हजार मतांची आघाडी; अक्षय कर्डिलेंची पहिली प्रतिक्रिया.....

राहुरी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना दहाव्या फेरीअखेर 44 हजार 789 मतांची आघाडी घेतली आहे. सुनेत्रा पवार बारामतीतून 78 हजार 528 मतांनी आघाडीवर आहे. अक्षय कर्डिले यांनी निवडणुकीतील विजय हा वडिलांवर मतदारांनी, सर्वसामान्यांनी केलेल्या प्रेमाचा आहे. मतदारसंघातील प्रत्येकाला आता संभाळण्याची जबाबदारी वाढील आहे, असे म्हटलं आहे.

Rohit Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 97 टक्के मते मिळतील

राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सकाळी साताऱ्याच्या कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 97 टक्के मतदान मिळेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Sunetra Pawar : 'विजय अजितदादांना समर्पित, गुलाल कोणीही उधळू नये'; सुनेत्रा पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 52 हजार 452 मतांची आघाडी घेतली आहे. बारामतीचा विजय हा अजितदादांना समर्पित आहे. विजयाचा जल्लोष कुणी कार्यकर्त्यांनी करू नये. गुलाल उधळू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आहे.

Rahuri By Election Result : राहुरी पोटनिवडणूक; मतमोजणीच्या सहाव्या फेरीचे कल समोर.....

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक सहावी फेरी अखेर मिळालेली उमेदवारांना मिळालेले मते : भाजप अक्षय कर्डिले- 29903, राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 4417, वंचित संतोष चोळके- 2178 अपक्ष रावसाहेब खेवरे- 2042. सहावी फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 25 हजार 486 मतांनी आघाडीवर आहेत.

Sanjay Raut : शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक, फायदा त्यांच्याच पुत्राला होणार; खासदार संजय राऊत

भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीत पोटनिवडणूक होत आहे. मविआचे उमेदवार तिथं होते. त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता. परंतु शिवाजी कर्डिले यांच्या निधानाचा फायदा त्यांचे पुत्र यांना होत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. भाजपचे अक्षय कर्डिले यांना 21 हजार 886 मतांची आघाडी घेतली आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांना आतापर्यंत 3 हजार 522 मते मिळातील. आतापर्यंत 32 हजार991 मतांची मोजणी झाली आहे.

Baramati and Rahuri By Election Result : सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना पाचव्या फेरीत मतांची मोठी आघाडी

बारामतीतून सुनेत्रा पवार यांना 45 हजार 10 मतांची, तर राहुरीतून अक्षय कर्डिले यांना 20 हजार 849 मतांची आघाडी मिळाली आहे. हे दोन्ही उमेदवार महायुतीचे आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीकडून 40 पेक्षा जास्त स्टार प्रचारक मैदानात उतरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही ठिकाणी प्रचार सभा घेतली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीत सभा घेतली होती.

Rahuri By Election Update : भाजपचे अक्षय कर्डिले यांना 18 हजार 123 मतांची आघाडी

भाजपचे अक्षय कर्डिले यांनी चौथ्या फेरीत पुन्हा मोठी आघाडी घेतली असून, त्यांना 18 हजार 123 मतांची आघाडी मिळाली आहे. अक्षय कर्डिले यांच्या मतांच्या आघाडीजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचे उमेदवार कुठेच नाही. शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे हे 9 हजार 636 मतांनी पिछाडीवर आहे.

Baramati and Rahuri By Election Result : सुनेत्रा पवार अन् अक्षय कर्डिले यांना मतांची मोठी आघाडी

बारामतीत सुनेत्रा पवार यांना 26 हजार 773 मतांनी आघाडी घेतली आहे. राहुरी पोटनिवडणुकीत तिसऱ्या फेरीत भाजपचे अक्षय कर्डिले यांनी देखील मोठी आघाडी घेतली असून, त्यांनी 14 हजार 711 मतांनी आघाडी घेतली आहे.

Baramati By Election Update : बारामतीत दुसऱ्या फेरीत सुनेत्रा पवार यांना 16 हजार 543 मतांची आघाडी

बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 16543 मतांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीची मतमोजणी झाली आहे. दोन लाख मतांनी विजय होणार असल्याचा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे.

Rahuri By Election Update : राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले 4 हजार 988 मतांनी आघाडीवर...

राहुरी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. अक्षय कर्डिले यांनी 4 हजार 988 मतांनी आघाडी घेतली आहे. पोस्टर मतदानापासून देखील अक्षय कर्डिलेंनी मतांची आघाडी घेतली आहे.

Baramati By Election Result : बारामतीत सुनेत्रा पवार यांची पहिल्या फेरीत साडेसहा हजार मतांची मोठी आघाडी घेतली

बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या 6 हजार 500 मतांनी आघाडीवर आहे. पहिल्या फेरीची मोजणी झाली असून, यात सुनेत्रा पवार यांनी मतांची मोठी आघाडी घेतली आहे.

Rahuri By Election Result : राहुरी पोटनिवडणुकीत पहिल्या फेरीत भाजपचे अक्षय कर्डिले 460 मतांनी आघाडीवर...

राहुरी पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानांची मोजणी 27 फेऱ्यांमध्ये होत असून, पहिल्या फेरीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले 460मतांनी आघाडी घेतली आहे. पोस्टर मतदानामध्ये देखील अक्षय कर्डिलेंनी आघाडी घेतली आहे.

Baramati By Election : बारामती अन् राहुरी पोट निवडणुकीसाठी झालेल्या मतांची मोजणी सुरू; पोस्टल मतदानात महायुतीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर

Baramati and Rahuri By Election Result
Baramati and Rahuri By Election ResultSarkarnama

बारामतीत आज विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीला सुरवात झाली असून, सुनेत्रा पवार राज्यात नव्हे तर देशातील विक्रमी मतदानाचे रेकॉर्ड मोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. पोस्टल मतमोजणी सुरू झाली असून, महायुतीचे दोन्ही ठिकाणचे उमेदवार आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com