NCP Crisis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Crisis : तनपुरेंवर भरवसा नाही! शरद पवारांनी दिले दोन 'एबी फाॅर्म', दुसरा फाॅर्म ठाकरेंच्या शिलेदाराला...

NCP Sharad Pawar faction issues AB forms to both Prajakt Tanpure and Govind Mokate, sparking political buzz in Rahuri by-election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन जणांच्या नावानं एबी फाॅर्म काढल्याचं समोर आलं आहे.

Pradeep Pendhare

Rahuri Bypoll 2026 : राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दोन जणांच्या नावानं एबी फाॅर्म काढले आहेत.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि गोविंद मोकाटे, यांच्या नावाने दोन एबी फाॅर्म दिले आहेत. शरद पवार यांनी ही खेळी करत भाजपच्या संपर्कात असलेले माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंवर भरवसा नसल्याचं संकेत दिले आहेत, अशी आता चर्चा रंगली आहे.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस आहे. अक्षय कर्डिले भाजपकडून (BJP) अर्ज भरत आहेत. हा अर्ज भरण्यापूर्वी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली.

चव्हाण आणि विखे पाटील यांच्या भेटीत, तनपुरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून दिल्याची माहिती समोर येत आहे. बंद केबिनमध्ये प्राजक्त तनपुरेंशी (Prajakt Tanpure) अर्धा तास चर्चा झाली आहे. या चर्चेचा तपशील अजून समोर आलेला नाही. तोच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सावध झाले आहेत.

शरद पवार राष्ट्रवादीने राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरे यांच्याबरोबर गोविंद मोकाटे यांना देखील एबी फाॅर्म दिला आहे. शरद पवार राष्ट्रवादीने दोन जणांच्या नावाने एबी फाॅर्म काढत, सावध भूमिका घेतली आहे. गोविंद मोकाटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात आहेत. तसंच ते कर्डिले यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत.

मोकाटेंची जोरदार तयारी

गोविंद मोकाटे हे पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यांनी निवडणुकीच्या तिसऱ्याच दिवशी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढण्याची त्यांची तयारी आहे. महाविकास आघाडीकडून ते काँग्रेसच्या देखील संपर्कात होते. पण आता शरद पवार राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावाने एबी फाॅर्म दिल्याचे समोर आले आहे.

तनपुरेंच्या निर्णयाकडे लक्ष

शरद पवार राष्ट्रवादीने राहुरी पोटनिवडणुकीसाठी घेतलेल्या सावध भूमिकेकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे कोणत्या अँगलने पाहतात आणि निवडणुकीबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

गोविंद मोकाटे यांची राजकीय ताकद

गोविंद मोकाटे हे 2012 पासून राजकारणात सक्रिय आहे. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे ते कट्टर प्रतिस्पर्धी राहिले आहेत. नगर तालुक्यात त्यांनी पंचायत समितीची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांची मुलगी भाग्यश्री मोकाटे या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राहिल्या आहेत. नगर तालुक्यातील जेऊर गट हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील राहिला आहे. या गटावर ज्याचे प्राबल्य तो, पुढे राजकारणात यशस्वी, असे सांगितले जाते. मोकाटे हे तेथूनच प्रतिनिधीत्व करतात.

अजितदादांची मोकाटेंच्या घरी भेट

गोविंद मोकाटे हे राजकारणात सक्रिय होताना, शरद पवार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचा चांगला संपर्क राहिला आहे. अजित पवार हे तर त्यांच्या घरी जेवणासाठी हजेरी लावली होती. शिवसेना एकत्र असताना त्यांची मुलगी भाग्यश्री हिने जिल्हा परिषदे निवडणुकीत यश मिळवलं. शिवसेना फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT