Nagar Politics : भाजपचे आमदार राम शिंदे यांनी पुन्हा एकदा लोकसभेची इच्छा व्यक्त केली आहे. 'मी फक्त उमेदवारी मिळण्याची वाट पाहत आहे,' अशी प्रतिक्रिया देत शिंदे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात वर्षभरापासून तयारी करीत असलेले भाजपचे खासदार सुजय विखे यांची कोंडी केली आहे. लोकसभेसाठी राम शिंदेंच प्लस पाॅईंट असेल तरी, मंत्री राधाकृष्ण विखे हे सुजय विखे यांच्यासाठी 'किंगमेकर'च्या भूमिकेत आहेत.
अयोध्येत सोमवारी (ता. 22 जानेवारी) प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. भाजपकडून देशभरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. यात नगर जिल्हादेखील मागे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेचे आवाहन केले. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लगेचच धार्मिक स्थळांकडे धाव घेत स्वच्छतेची मोहीम सुरू केली आहे. नगर शहराचे ग्रामदैवत असलेला श्री विशाल गणपती मंदिरातदेखील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात भाजपचे आमदार राम शिंदे हे सहभागी झाले होते. स्वच्छता कार्यक्रम उरकल्यानंतर शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीवर माध्यमांसमोर भाष्य केले. मी फक्त उमेदवारी मिळण्याची वाट पाहत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. शिंदे यांच्या विधानाने भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. यातून नगर दक्षिणमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये कलह वाढताना दिसत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राम शिंदे म्हणाले, "मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे. तशी वेळोवेळी इच्छा व्यक्त केली आहे. आता फक्त उमेदवारी मिळण्याची वाट पाहत आहे. 2014 मध्ये मी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. परंतु, ती मला मिळाली नाही. 2019 मध्ये मला उमेदवारी मिळत होती. परंतु तेव्हा मी लढण्यासाठी तयार नव्हतो. पण आता 2024 ची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मी तयार आहे. कार्यकर्तेदेखील तयार आहेत. सलग पाच वर्षे पालकमंत्री राहण्याचा रेकॉर्ड माझ्या नावावर आहे. त्यामुळे लोकसभेसाठी मी आणि कार्यकर्ते पूर्ण तयारीत आहोत."
देशात मध्यंतरी पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून प्रत्येक राज्यातून भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रचारात उतरवले होते. राम शिंदे (Ram Shinde) हेदेखील यात सहभागी झाले होते. यातून शिंदे यांचा पक्षांतर्गत चांगलेच नेटवर्क तयार झाले आहे. तसेच राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळचे म्हणून राम शिंदे यांची ओळख आहे. त्यामुळे राम शिंदे लोकसभेसाठी उमदवारीवर जो दावा करीत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe-Patil) हे नगर जिल्ह्यातील प्रस्थापित संस्थानिक आहेत. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या रूपाने त्यांची चौथी पिढी भाजपकडून राजकारणात आहे. राधाकृष्ण विखे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संपर्कात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नगर जिल्ह्यातील दौरे मंत्री विखेंमुळे यशस्वी झाले आहेत. यावरून त्यांचे केंद्रातील वजन लक्षात आहे.
खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) हे संपूर्ण जिल्ह्यात साखर, डाळवाटपाचे कार्यक्रम घेत आहे. त्यांच्या या साखरपेरणीतून लोकसभा लक्ष्य आहे. यातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घराणेशाही विरोधात भूमिका आहे. यातून भाजपमध्ये एका कुटुंबात एकास उमेदवारी अशी भूमिका घेतली. विखे पिता-पुत्र सध्यातरी भाजपमधील कुरघोड्यांवर काहीच बोलताना दिसत नाही. स्थानिक भाजप नेत्यांकडून विखे पिता-पुत्रांवर कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच विखेंविरुद्ध सारे, असे सध्या तरी नगर जिल्ह्यातील राजकीय चित्र आहे. प्रशासकीय यंत्रणेचा पुरेपूर वापर मंत्री विखेंकडून होत असल्याने, या यंत्रणेतदेखील छुप्या नाराजीचा सूर आहे. असे असले, तरी मंत्री विखे हे राजकीय चाणक्य आहेत. ते काय चमत्कार करतील, हे सांगता येत नाही. मंत्री विखे हे नगर आणि राज्याच्या राजकारणात नेहमीच 'बाजीगर'च्या भूमिकेत राहिले आहे.
Edited By : Rashmi Mane
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.