Shivsena Ex. MLA Rajabhau Waje at Maratha agitation. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Agitation : सिन्नरमधील उपोषणाला सत्ताधारी व विरोधी दोन्ही आमदारांचा पाठिंबा!

Sampat Devgire

Sinner Maratha Agitation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना येथे सुरू झालेल्या उपोषण आंदोलनानंतर राज्याच्या विविध भागात त्याला पाठिंबा देण्यात येत आहे. सिन्नर येथे ग्रामस्थांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही आमदारांनी पाठिंबा दिला आहे. (Hunger strike at Sinner for Maratha reservation)

पांगरी (ता. सिन्नर) (Nashik) येथे मराठा (Maratha) समाजाला राज्य सरकारने (Maharashtra Government) आरक्षण जाहीर करावे, यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्याला सबंध ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.

पांगरी ग्रामस्थांनी गेल्या बुधवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यात रोज दहा जण सहभागी होतात. या उपोषणाला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे आणि विरोधी गट शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.

मराठा आरक्षणावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आठवडाभरापासून ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू आहे. तालुक्यातील अनेक गावांतील मराठा समाजबांधव साखळी उपोषणात सहभागी होऊ लागले आहेत.

दुष्काळाकडे लक्ष वेधले

दरम्यान, आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून सिन्नर तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीकडे पांगरी ग्रामस्थांनी लक्ष वेधले. जनावरांसाठी चारा, पिण्याचे पाणी, नुकसानभरपाईच्या माध्यमातून खरिपाचा वाया गेलेला खर्च मिळावा, समाजातील प्रत्येक घटकासाठी टंचाई सवलती द्याव्यात, अशी मागणी तहसीलदारांमार्फत शासनाकडे केली आहे.

या आंदोलनात जगदीश पांगारकर, संपत पगार, ज्ञानेश्वर पांगरकर, मयूर पांगारकर, निखिल पांगारकर, विश्वास पांगरकर, संपत पगार, संदीप हिरे, सुनील चव्हाण, प्रकाश पांगारकर, चंद्रभान दळवी, विलास पांगारकर, रमेश पांगारकर, सोपान वारुळे, जीवन पांगारकर, समाधान पांगारकर, प्रकाश पेखळे आदी या आंदोलनाचे संयोजन करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT