Sanjay Raut & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut News : सामनाच्या बातमीत संजय राऊतांनी माफी चा 'म' पण छापला नाही, 'तो' खास शब्द वापरुन विषय संपवला

Dada Bhuse defamation case : संजय राऊत यांच्यावर शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला होता. मालेगाव कोर्टात हा खटला सुरु होता, जो दादा भुसेंनी आता मागे घेतला आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : मालेगाव तालुक्यातील गिरणा सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स जमा करताना १७८ कोटी रुपयांचा कथित घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याविरोधात शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव कोर्टात राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यावर आपण चुकीच्या माहितीच्या आधारावर आरोप केले अशी कबुली राऊत यांनी दिली. राऊत यांनी न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेला मानहानीचा फौजदारी खटला मागे घेतला. त्यामुळे भुसे व राऊत यांच्यातील वादावर पडदा पडला.

दादा भुसे यांनी देखील यांसदर्भात माहिती देताना सांगितले की, याप्रकरणाची पडताळणी केल्यानंतर राऊत यांना हे आढळून आलं आहे की, "त्यांनी केलेला आरोप चुकीचा व खोटा आहे. अद्वय हिरे यांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी हे आरोप केले होते. मात्र प्रसिद्ध झालेले वृत्त तथ्यहीन असल्याचे राऊत यांच्या लक्षात आले. चुकीच्या आरोपांमुळे मालेगावच्या शेतकऱ्यांची बदनामी झाली. त्यांनी मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची व सभासदांची माफी मागितली आहे, दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या तब्येतीचा विचार करुन आम्ही मोठ्या मनाने हा खटला मागे घेतला आहे."

दरम्यान, ऐरवी पक्षाची बाजू ठामपणे मांडणारे आणि विरोधकांवर आक्रमक भूमिका मांडत आरोपांची राळ उठवणाऱ्या संजय राऊत यांनी चक्क खटला मागे घ्यावा म्हणून दादा भुसे यांची माफी मागितल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. संजय राऊत माफी मागून आनंदी झालेला पहिला माणूस असेल अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली. सर्व प्रसारमाध्यमांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये राऊतांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली असे छापून आले.

मात्र, सामनात या प्रकरणी छापलेल्या वृत्तात कुठेही माफी हा शब्द छापलेला नाही. त्याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मंत्री दादा भुसे यांच्याकडून राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा मागे, गिरणा कारखाना आरोपप्रकरणी खेद व्यक्त अशा मथळ्याखाली सामनाने या प्रकरणाची बातमी छापली आहे. त्यांनी माफी मागितली असे न लिहता खेद व्यक्त केल्याचं लिहलं आहे.

शिवसेनेतून भाजपात गेलेले अद्वय हिरे यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरून गिरणा सहकारी साखर कारखान्याचे शेअर्स जमा करताना कथित घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला होता. यामुळे कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. त्यामुळे मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरुद्धचा मालेगाव न्यायालयातील अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला. असे सामना मध्ये छापले आहे.

तसेच रविवारी माध्यमांशी बोलतानाही संजय राऊत यांनी ही गोष्ट स्पष्ट केली. माफी मागणे व खेद व्यक्त करणे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. आपण माफी मागितली नाही तर खेद व्यक्त केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. माफी हा शब्द न वापरता राऊतांनी खेद हा शब्द वापरला आहे. यातून आपण माफी मागितली हा दादा भुसे यांनी केलेला दावा एकप्रकारे राऊत यांनी खोडण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT