MLA Satyajeet Tambe hunger strike announcement: शिक्षण विभागात शालेय आयडीवरुन राज्य पातळीवर सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. त्यातच विभागातील वाढता अनागोंदी कारभार, चौकशीच्या नावाखाली रखडलेली शिक्षकांची कामे आणि प्रशासकीय कामांचा वाढता ताण याविरोधात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी येत्या २१ तारखेला पुणे येथे शिक्षण आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्यास २५ मे पासून स्वतः शिक्षण आयुक्तालयात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आमदार तांबे यांनी दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील रखडलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रविवारी (दि. १७) नाशिकच्या गंजमाळ येथील रोटरी क्लब सभागृहात 'शिक्षण परिषद' पार पडली. या परिषदेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत तांबे बोलत होते.
यावेळी, चौकशीच्या नावाखाली शिक्षकांची रखडलेली वैयक्तिक कामे व प्रलंबित मान्यता तत्काळ मार्गी लावाव्यात., जनगणना, मतदार नोंदणी यांसारख्या अतिरिक्त कामांतून शिक्षकांची मुक्तता करावी.
उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचा शिक्षण विभागाने स्वतंत्र आढावा घेऊन स्थानिक प्रश्न सोडवावेत., प्रशासकीय अनागोंदी थांबवून प्रत्यक्ष अध्यापनावर लक्ष केंद्रित करावे अशा मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
आमदार तांबे यांनी शिक्षकांच्या सद्यःस्थितीवर बोट ठेवताना, आंदोलन केल्याशियाय पर्याय नाही असं मत व्यक्त केलं. शिक्षकांना अध्यापनाऐवजी बीएलओ, विविध सर्वेक्षणे, नोंदणी आणि अन्य शासकीय कामांमध्ये जुंपले जात आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असून, विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात आपण शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचीही भेट घेऊन चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकभरती, अनुदान, प्रलंबित मान्यता, शाळांवरील प्रशाकीय ताण, विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधा तसेच शिक्षकेतर कामांमुळे बिघडलेली शिक्षणव्यवस्था या मुद्यांवर आमदार तांबेंनी नाराजी व्यक्त केली.
रविवारी झालेल्या बैठकीत उपस्थित शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली. एसआयटीच्या नावाखाली कामे रखडवली जात आहेत. शिक्षक समायोजनाचा प्रश्न यासह इतर प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेतला.
नाशिक-पुणे रेल्वेबाबत खंत...
यावेळी बोलताना आमदार तांबे यांनी नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. हा प्रकल्प रखडणे किंवा त्याला 'रेड सिग्नल' मिळणे हे नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटलं. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पुणे यांमधील कनेक्टिव्हिटी वाढणार होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे तो लांबणीवर पडणे, हे जिल्ह्याचे नुकसान असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.