Crime News
Crime News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : धुळ्यात खळबळ; भाजपच्या जिल्हाध्यक्षासह चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Sachin Waghmare

Dhule News : भाजपच्या धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र महादेव अंपळकर यांच्या व्यायाम शाळेत कुस्ती शिकण्यासाठी जात असलेल्या लहान बहीण भावाच्या अल्पवीयन पीडित युवतीशी अंगलट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दादू राजेंद्र राजपूत जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी अल्पवयीन पीडितेच्या वतीने तिच्या बहिणीने कोर्टात (Court) धाव घेतल्याने चार जणांविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचाआदेश पारित झाला आहे. या प्रकरणात संशयित आरोपीमध्ये हर हर महादेव व्यायाम शाळेचा कुस्ती प्रशिक्षक दादू राजपूत, गजेंद्र महादेव अंपळकर, कल्याणी सतीश अंपळकर, सुहास सतीश अंपळकर, जतिन उर्फ अजय आव्हाळे यांचा समावेश आहे. कोर्टामार्फत पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल करण्याचे आदेश मिळाले आहेत. (Dhule Crime News)

अल्पवयीन मुलीचे लहान बहिण व भाऊ हे अंपळकर यांच्या हर हर महादेव व्यायाम शाळेत कुस्ती शिकण्यासाठी जात असलेल्या लहान बहीण भावाच्या अल्पवीयन पीडित युवतीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. ‘माझे ऐकले नाही तर तुझ्या परिवाराला जीवे ठार मारेल’ अशी धमकी ही दिली.

दरम्यान याच कारणावरून पीडितेसह तिची आई व कुटुंबातील सदस्यांना रस्त्यात अडवून पुन्हा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. सुटका करून घरी जात असताना गजेंद्र आंपळकर यांनी पोलिसात न जाण्याची धमकी दिली.मात्र तरीही पीडित युवतीची बहीण व तिची आई दोन्ही भावांसह चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांनतर कल्याणी अंपळकर यांनी दाखल केलेली तक्रार नोंदवून घेत फिर्यादी, तिची आई व दोन्ही भावांना अटक केली. त्यामुळे त्यांना रिमांड होममध्ये ठेवण्यात आले. बाहेर आल्यानंतर पुन्हा चाळीसगाव रोड पोलिसांना विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी नकार दिल्याने या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने खातर जमा करून पोक्सोसह विविध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

SCROLL FOR NEXT