Lok Sabha Election News : मुंबईतील मतदानासाठी प्रशासन सज्ज; तब्बल 22100 पोलिसांचा असणार वॉच

Police News : मुंबईतील सहा तर उपनगरातील चार लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. या निवडणुकीच्या कामासाठी 2475 पोलीस अधिकारी, 22100 पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.
Maharashtra Police
Maharashtra PoliceSarkarnama

Mumbai News : मुंबईत लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. शनिवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडाविल्यानंतर आता पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. मुंबईतील सहा तर उपनगरातील चार लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. या निवडणुकीच्या कामासाठी 2475 पोलीस अधिकारी, 22100 पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.

त्याशिवाय 5 अपर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपआयुक्त, 77 सहायक पोलीस आयुक्त (Police Dept) यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी व 22100 पोलीस अंमलदार व 03 दंगल काबु पथक (RCP) बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहेत. तर त्यांच्यासोबत अतिरिक्त मदतीकरीता 170 पोलीस अधिकारी (Police Offiser) व 5360 पोलीस अंमलदार व 6200 होमगार्ड असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. (Lok Sabha Election News)

Maharashtra Police
Modi Vs Pawar : आधी मोदींची लोकांमध्ये हवा, नंतर मनातूनच उतरले; लोकसभेचं वारं नेमकं कसं फिरलं पवारांनी सांगितलं

त्यासोबतच शहरातील महत्वाच्या ठिकाणी 36 केंद्रिय सुरक्षा दले यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदानादरम्यान एकूण 2752 पोलीस अधिकारी, 27460 पोलीस अंमलदार, 6200 होमगार्ड, 03 दंगल काबु पथक, 36 केंद्रिय सुरक्षा दले निवडणुक बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहेत.

16 मे पासून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुक पार पाडण्याकरीता एकूण 8088 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कलम 144 अन्वये 15-05-2024 रोजी मुंबई पोलीसांकडुन आदेश प्रसारीत करण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मतदान केंद्राच्या आत मोबाइलला परवानगी नाही

मतदानावेळी सर्वच केंद्रावर पोलिसांचा मोठा वॉच असणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रांच्या १०० मीटर परीघात (मतदान केंद्र परिसर) आणि मतदान केंद्राच्या आत मोबाईल फोन इत्यादी न बाळगता किंवा न वापरता नियमांचे पालन करण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Police
Pune Police News: मतदानापूर्वी पुणे पोलिस अलर्ट; 9 हजार 255 गुंडांची झाडाझडती; पैसे वाटपावर लक्ष

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com