Former VC Dr Sarjerao Nimse event : देशासह राज्यात बेरजेच्या राकारणात चांगल्या-चांगल्याची भंबेरी उडवून देणारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गणित विषयाची किस्सा सांगून एकच हशा पिकवला.
माजी कुलगुरू डाॅ. सर्जेराव निमसे यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमानिमित्ते शरद पवार आज अहिल्यानगरमध्ये आले होते. कुलगुरू आणि शिक्षण आणि विकास या दोन ग्रंथांचं त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. सर्जेराव निमसे यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचं कौतुक करताना, महाविद्यालयीन जीवनातील गणित विषय किस्सा सांगताच, सभागृहात एकच हशा पिकला.
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचा आहे. पंडित नेहरू अन् अहमदनगरच एक वेगळं नातं होतं. तसं एक समीकरणच तयार झालं होतं. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महात्मा गांधी यांना अटक करून पुण्यामध्ये आणलं. त्यानंतर काँग्रेसची वर्किंग कमिटी होती, त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये आणण्यात आलं. त्यात पंडित जवाहरलाल नेहरू देखील होते." पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 'डिस्कवरी ऑफ इंडिया', हा ग्रंथांचं लिखाण ह्याच अहमदनगरच्या किल्ल्यात केलं. ही 14 तारीख अत्यंत महत्त्वाची असून सर्जेराव निमसे यांचाही जन्मदिवस आहे. हे गृहस्थ शेतकरी कुटुंबातील आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले.
'नगर जिल्हा, विशेषतः दक्षिण भाग हा अत्यंत अडचणीचा, दुष्काळ हा पाचवीला पुजलेला असायचा. असं असलं, तरी या भागातून अनेक नेतृत्व उभी राहिली. अनेक समस्यांवर मात करत सर्जेराव निमसे यांनी 40 वर्षे शिक्षणाच्या माध्यमातून सेवा केले. गणित हा त्यांचा आस्थेचा विषय. गणितावर त्यांच्याशी चर्चा करायची म्हटल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. पण माझं व्यक्तिगत अनुभव वेगळा. गणित माझं अतिशय कच्चं. कॉलेजमध्ये (College) असताना मी कधीही गणिताच्या आसपास राहिलो नाही. कॉलेजला गेल्यानंतर तिथं गणिताला काही पर्याय आहे का? याचा शोध घेतला, तर 'बिझनेस ऑफ मॅनेजमेंट', हा पर्याय आहे, याचा शोध लागला अन् त्यानंतर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं,' असं शरद पवार यांनी सांगताच, एकच हशा सभागृहात पिकला.
'गणित विषयात सर्जेराव निमसे यांनी 40 वर्ष योगदान दिलं. भारतीय विज्ञान काँग्रेस असोसिएशनचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं. देशाच्या पंतप्रधान यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ते स्वीकारलं. या सोहळ्यामध्ये गणिताच्या संबंधी आस्था असलेल्या अनेक लोकांचा सहवास मिळाला,' अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
'सर्जेराव निमसे यांनी दोन ठिकाणी कुलगुरू पदाची जबाबदारी देखील निभावली. नांदेड आणि लखनऊ विद्यापीठांमध्ये ते कुलगुरू होते. नांदेडच्या विद्यापीठाची माझा काहीसा संबंध होता. परंतु औरंगाबादच्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिल्यानंतर तिथे एक वाद निर्माण झाला होता. या वादातून मार्ग काढण्यासाठी, काही सहकाऱ्यांना निमंत्रित केलं. औरंगाबाद विद्यापीठाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विस्तार करू. अन् दुसरे विद्यापीठ हे स्वामीजींच्या नावाने विस्तारित करू, ते म्हणजे नांदेड विद्यापीठ. नांदेड विद्यापीठाच्या नाम विस्तारानंतरचे त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. वाघमारे होते. आणि त्यानंतर डॉ. सर्जेराव निमसे यांनी त्या विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी यशस्वीपणे संभाळल्याचे,' शरद पवार यांनी सांगितले.
'लखनऊ विद्यापीठ अडचणीतून चालले होते. त्यावेळेस त्याची जबाबदारी सर्जेराव निमसे यांच्यावर आली. अशावेळी तिथं राज्यपाल राम नाईक होते. माझे चांगले मित्र होते. त्यावेळेस त्यांच्याशी संवाद साधताना, आमचा सरळ मार्गी सर्जेराव निमसे अशा विद्यापीठाची जबाबदारी संभाळेल का? असा प्रश्न केला. त्यावेळेस राम नाईक यांनी अडचणीच्या काळामध्ये सर्जेराव नेमसे यांनी विद्यापीठाचा कारभारात सुसंवाद आणला. विद्यार्थी-पालक-प्राध्यापक आणि आमच्या मध्ये चांगल्या सुसंवादातून, सर्जेराव निमसे यांनी विद्यापीठाला पूर्वीचे दिवस दाखवल्याची पावती राम नाईक यांनी माझ्याकडे दिली,' अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
सर्जेराव यांच्या कार्यक्रमानिमित्ताने दोन ग्रंथांचे प्रकाशन झालं. त्यातील एका ग्रंथांमध्ये 'एआय'चा उल्लेख आहे. आज यामुळे शिक्षण, आरोग्य, प्रशासनामध्ये वेगाने बदल घडत आहे. जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलाची नोंद ग्रंथांत घेतल्याचे कौतुकही शरद पवार यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.