rohini khadase Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti ministers : काटकसरीच्या घोषणा अन् मंत्र्यांची 'EV' कार शान; रोहिणी खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Rohini Khadse targets Mahayuti ministers over luxury EV car purchases, raises concerns about farmers and Maharashtra electricity crisis : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर मंत्र्यांचा ईव्ही कार खरेदीचा सपाटा सुरू केला असून, वीज तुटवड्याचा खड्डा शेतकऱ्यांनीच भरायचा का? असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला.

Pradeep Pendhare

Mahayuti ministers : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज्यातील मंत्री आणि नेत्यांकडून ईव्ही कार खरेदी व वापराला वेग आला आहे.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत, “ही भूमिका शेतकऱ्यांसाठी खड्डा खणणारी ठरू शकते,” असा टोला लगावला आहे.

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, शिवसेना मंत्री उदय सामंत आणि भाजप मंत्री नीतेश राणे यांचे आलिशान ईव्ही कारसह फोटो शेअर करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

खडसे म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काटकसरीचे आवाहन करत पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यास सांगितले. त्यानंतर राज्यातील मंत्री-संत्री नव्या कोऱ्या ईव्ही कार घेण्यात व्यस्त झाले आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या की, मंत्री आणि नेत्यांची ही भूमिका म्हणजे लोकांनाही ईव्ही कार वापरण्याचा अप्रत्यक्ष संदेश देण्यासारखी आहे. मात्र, दुसरीकडे पावसाळा तोंडावर असताना आणि पेरणीचा हंगाम सुरू होत असताना शेतकऱ्यांना आठ-आठ तासांच्या लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. वेळेवर वीज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“मंत्री आणि नेत्यांना कुठेही वीज उपलब्ध होते. ते कितीही वीज वापरू शकतात. मात्र, त्याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसतो. भविष्यात सर्वांनीच मोठ्या प्रमाणावर ईव्ही कार वापरण्यास सुरुवात केली, तर राज्यात विजेचा तुटवडा अधिक तीव्र होऊ शकतो. सध्या आठ तास असणारे लोडशेडिंग उद्या 15 ते 16 तासांपर्यंत जाऊ शकते,” अशी भीतीही रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाचा चुकीचा अर्थ लावू नका. पीआर आणि मार्केटिंगसाठी प्रत्येक गोष्ट वापरण्यापेक्षा शेतकऱ्यांचा विचार करा, असा खोचक टोला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT