Sangamner Rail News : पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड प्रकल्प गुंडाळला? आता गुजरातमधून धावणार पहिली सेमी-हाय-स्पीड रेल्वे; केंद्र सरकारची मंजुरी

Centre approved Gujarat Ahmedabad-Dholera semi high-speed rail corridor India first project, future Maharashtra long-pending Pune-Nashik rail corridor amid route change controversies and GMRT-related objections : अहमदाबाद-धोलेरा प्रकल्पाला केंद्राची हिरवी झेंडी मिळाली असली, तरी दुसरीकडे GMRTमुळे बदललेल्या पुणे-नाशिक मार्गावरून महाराष्ट्रात संताप आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी फेरअभ्यासाचा सूचना दिल्या आहेत.
Pune Nashik Rail Project 1
Pune Nashik Rail Project 1Sarkarnama
Published on
Updated on

Semi High Speed Rail India : केंद्रीय आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या अहमदाबाद (सारखेज)-धोलेरा सेमी हाय-स्पीड दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्रातील पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

सुमारे 20 हजार 667 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला देशातील “पहिला सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प” म्हणून घोषित करण्यात आल्याने, महाराष्ट्रातील बहुचर्चित पुणे-नाशिक रेल्वे कॉरिडॉरचे भवितव्य काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Central Government) बैठकीनंतर माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अहमदाबाद, धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र (SIR), प्रस्तावित धोलेरा विमानतळ आणि लोथल राष्ट्रीय सागरी वारसा संकुल यांना जोडणारा हा प्रकल्प भारतातील आधुनिक रेल्वे वाहतुकीचा नवा अध्याय ठरणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, रोजचा आरामदायी आणि एकाच दिवशी ये-जा करणारा प्रवास शक्य होईल, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

रेल्वे (Railway) मंत्रालयाच्या माहितीनुसार, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित होणारा हा देशातील पहिला सेमी हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर असेल. त्यामुळे देशभर टप्प्याटप्प्याने अशा प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी हा “मॉडेल प्रकल्प” ठरेल, असेही मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केले.

मात्र, दुसरीकडे महाराष्ट्रातील पुणे-नाशिक सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प अजूनही वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. संगमनेरमार्गे जाणारा मूळ मार्ग बदलून तो शिर्डीमार्गे नेण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

GMRTमुळे बदलला मार्ग

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग नारायणगाव परिसरातील ‘GMRT’ रेडिओ दुर्बिणीच्या बफर झोनमधून जात होता. या दुर्बिणीच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार रेल्वे मंत्रालयाने मार्ग बदलून तो शिर्डीमार्गे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, या बदलामुळे जुन्नर, मंचर आणि संगमनेर परिसरातील नागरिक, शेतकरी आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत.

संगमनेरमध्ये पहिली ठिणगी

या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत यांनी विविध लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून मूळ मार्गासाठी एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. संगमनेरमार्गेच रेल्वे मार्ग व्हावा, अशी स्थानिकांची मागणी कायम आहे.

फडणवीसांकडून फेरअभ्यास सुरू

स्थानिकांच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. विधिमंडळात बोलताना त्यांनी जुन्या मार्गाचा पुन्हा तांत्रिक अभ्यास सुरू असल्याचे स्पष्ट केले. GMRT संदर्भातील अडचणी सोडवून मूळ सरळ मार्ग कसा विकसित करता येईल, यासाठी तज्ज्ञ समितीकडून फेरअभ्यास आणि तांत्रिक पाहणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

गुजरात प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या रेल्वे स्वप्नाला धक्का?

दरम्यान, गुजरातमधील अहमदाबाद-धोलेरा सेमी हाय-स्पीड रेल्वेला “देशातील पहिला प्रकल्प” असा दर्जा देण्यात आल्याने महाराष्ट्रातील पुणे-नाशिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. हा प्रकल्प रखडणार का? की नव्या तांत्रिक बदलांसह पुन्हा वेगाने पुढे जाणार? याकडे आता पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com