shantigiri maharaj rajabhu waje hemant godse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hemant Godse Vs Rajabhau Waje News : नाशिकमध्ये शिंदेंचे गोडसे की ठाकरेंचे वाजे ? राजकीय विश्लेषकांचं नेमकं म्हणणे काय ?

Sachin Waghmare

Nashik News : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी चुरशीने मतदान झाले. यामध्ये राज्यातील 13 जागांवर मतदान पार पडले. यावेळी सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिक मतदारसंघात हाय होल्टेज लढत पाहवयास मिळाली. या जागेवरचा कल काय असणार ? याविषयी सविस्तर विश्लेषण राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी केले आहे. त्यामुळे चर्चेत असल्येल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा कल काय असणार याचा अंदाज येतो.

नाशिक मतदारसंघात महायुतीचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) रिंगणात उतरले होते. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून (MVA) शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे मैदानात उतरले होते. त्यासोबाबतच अपक्ष म्हणून शांतीगिरी महाराज (Shangiri Maharaj) यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत पुढे जाईल, तशी रंगतदार ठरली.

नाशिकच्या जागेवर भाजपने यापूर्वी दोन वेळा खासदार असलेल्या हेमंत गोडसेंना उमेदवारी देऊ नये, असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला होता. त्यांचा परफॉर्मन्स चांगला नसल्याने उमेदवार बदलण्यास सांगितले होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवाराची शोधाशोध सुरु केली होती.

नाशिकच्या जागेवर महायुतीमधील तीन पक्षांचा डोळा होता. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार म्हणून तयारी सुरु केली होती. मात्र, मराठाविरुद्ध ओबीसी वादात त्यांची अडचण होईल, हे लक्षात आल्याने त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. दुसरीकडे या जागेवर भाजपने तयारी सुरु केली होती. आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांनी भाजपचा उमेदवार द्यावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोर लावला होता. मात्र, जागावाटपाचा तिढा खूप उशिरा सुटला व शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. उमेदवारी पुन्हा हेमंत गोडसे यांनाच दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मतदारसंघाच्या या निकालाबाबत अंदाज व्यक्त करताना देसाई यांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. या निवडणुकीत महायुतीने हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यास उशीर केला. छगन भुजबळ नाराज असल्याने त्यांनी गोडसेचे काम केले की नाही ? शांतगिरी महाराज यांची गिरीश महाजन यांनी भेट घेऊनही उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे शांतीगिरी महाराजांच्या पारड्यात कोणाची मते पडली असणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

राजाभाऊ वाजे यांना सुरुवातीपासून प्रचारासाठी मोठा वेळ मिळाला. त्या सॊबतच मराठा समाजाचा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतदान केले त्याचा फायदा वाजे यांना दिसत आहे. या मतदार संघात मराठा आंदोलनाचा अंडर करंट मोठ्याप्रमाणात जाणवला. त्यामुळे त्याचा फायदा ठाकरे गटाला होण्याची शक्यता आहे.

त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहता संपूर्ण चित्र वेगळे दिसत होते. उद्धव ठाकरेंनी दोन तीन वेळा केलेले नाशिक दौरे व ठाकरे व शरद पवार यांच्याविषयी असलेली सहानभूती यामुळे पारडे जड वाटत असले तरी मशालविरुद्ध बाण ही अटीतटीची लढत झाली. यामध्ये अल्पशा मतांनीच दोघांपैकी एकजण बाजी मारेल, असे चित्र दिसत आहे.

कांदा कोणाला रडविणार ?

नाशिक, दिंडोरी व धुळे मतदारसंघात शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न महत्वाचा आहे. निर्यातबंदी लागू झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नाशिकमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी भाषण सुरू असताना एकाने कांदा निर्यातबंदीचा प्रश्न उपस्थित केला. मात्र, मोदी त्यावर काहीही बोलले नाहीत. त्या घटनेचा काहीसा परिणाम झाला. त्यासोबतच मनसेंनी मदत केली नाही. त्याशिवाय छगन भुजबळ यांनी काही वक्तव्य करताना घेतलेली उद्धव ठाकरेंची बाजू यामुळे सहाजिकच कल समजून येतो, असेही यावेळी देसाई यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT