Sadashiv Lokhande On Radhakrishna Vikhe Patil .jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Controversy: शिर्डीत विखेंमुळेच 'गेम'..! हॅट्ट्रिकची संधी हुकलेल्या सदाशिव लोखंडेंचं मोठं विधान; म्हणाले,'लोकसभेला माझी...'

Sadashiv Lokhande Political News: सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सहकार्याचं राजकारण केलं.नगर जिल्ह्यामधील संस्थानिकांबरोबर त्यांनी नेहमी जुळवून घेतलं. पण एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी महायुतीत खटके उडत असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डीतही त्याचे धक्के बसण्याची शक्यता आहे.

Deepak Kulkarni

Shirdi News: गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट लढत झाली.यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोखंडेंची हॅट्ट्रिकची संधी हुकवत विजय मिळवला होता. आता याच शिर्डीतील जिव्हारी लागलेल्या पराभवाबाबत सदाशिवराव लोखंडेंनी (Sadashiv Lokhande) धक्कादायक विधान करताना थेट महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या विखे पिता-पुत्राकडे बोट दाखवलं आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथे माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या संपर्क कार्यालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्याच्या नियोजनाविषयीची शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. याच बैठकीत लोखंडेंनी लोकसभेतील पराभवामागची खदखद उघडपणे बोलून दाखवली.

सदाशिव लोखंडे म्हणाले,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सर्वसामान्यांसह लाडक्या बहिणी, शेतकरी प्रेम करतात, मी खासदार असताना मला येथील साखरसम्राटांशी संघर्ष करावा लागला. हे साखरसम्राट वरती तडजोड करतात. मात्र, आम्हाला अधिकारासाठी संघर्ष करावा लागतो. या संघर्षामुळेच लोकसभेला आमची विकेट घेतली.

आपल्याला एकनाथ शिंदे यांनी विकासकामांसाठी भरपूर मदत केल्याचंही लोखंडे यांनी यावेळी सांगितलं. पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे, सरकारच्या योजनांच्या माध्यमातून त्यांना मदत करायला हवी ,असंही लोखंडे यांनी या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत म्हटलं. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संगमनेर येथील आभार दौऱ्यासाठी सर्वांनी गट-तट विसरून उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना आपण एका रात्रीत तत्कालीन पालकमंत्र्यांना न विचारता 182 गावांना पाणी सोडायला लावल्याचा दावाही माजी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी केला. याचदरम्यान,त्यांनी शिर्डीतील पूरग्रस्तांना 1 कोटी 10 लाख रुपये मिळून दिल्याचंही समोर आणले

शिवसेनेचे नेते लोखंडे यांनी यावेळी आपल्याला प्रस्थापितांविरोधात मोठा संघर्ष करावा लागला आणि त्याचाच परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत भोगावा लागल्याची खंतही व्यक्त केली.पण आता यापुढे चांगल्या-वाईटाच्या वादात न पडता एकत्र काम करत राहू, समाजाच्या सुखदुःखात उभे राहू.पक्ष काय करेल ते करेल,पण आपण काम करत राहू असा विश्वासही त्यांनी पदाधिकार्‍यांमध्ये निर्माण केला.

या बैठकीला पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुनीता शेळके, संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार,जिल्हा संघटक विजय काळे, किसान महासंघ कृषी प्रोडूसर कंपनीचे संचालक प्रशांत लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, यांसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत हॅट्ट्रिकची संधी हुकलेल्या सदाशिव लोखंडे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून चाचपणी केल्याचंही समोर आलं होतं. त्यानुसार ते मतदारसंघात 'अॅक्टिव्ह'झाल्याचेही बोलले जात होते. पण लोखंडेंना हे गणित काही केल्या साध्य झालंच नाही.

सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सहकार्याचं राजकारण केलं.नगर जिल्ह्यामधील संस्थानिकांबरोबर त्यांनी नेहमी जुळवून घेतलं.पण एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी महायुतीत खटके उडत असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डीतही त्याचे धक्के बसण्याची शक्यता आहे. कारण लोखंडे यांच्या विधानानंतर भाजपमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून कसा पलटवार करण्यात येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT