Akole Rajur Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Akole Rajur Gram Panchayat : राजूरमधील कावीळ साथीवरून शिवसेना आक्रमक; ग्रामपंचायत कारभाराची 'SIT' चौकशी मुख्यमंत्री लावणार का?

Shiv Sena Demands CM Devendra Fadnavis to Dismiss Akole Rajur Gram Panchayat : राजूर ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या निषेधासाठी शिवसेना 20 मे रोजीपासून आंदोलन करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषद घेत दिला.

Pradeep Pendhare

Shiv Sena demand : राजूर इथल्या काविळीच्या साथीवरून शिवसेना आक्रमक झाली आहे. राजूर ग्रामपंचायतीच्या कारभाराची SIT स्थापन करून चौकशी करावी, काविळीच्या साथीची जबाबदारी स्वीकारून सरपंच, सदस्यांचा राजीनामा द्यावा, राजूर ग्रामपंचायत बरखास्त करावी, अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक नेते संतोष मुतडक यांनी केली.

राजूर ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या निषेधासाठी 20 मे रोजीपासून आंदोलन करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषद घेत दिला.

शिवसेनेचे (Shivsena) संतोष मुतडक यांनी राजूर ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करून ग्रामपंचायत सरपंचासह सर्व सदस्यांनी राजीनामे द्यावेत. राजूर इथं अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाल्याने काविळीची साथ पसरली. चारशे जणांना काविळीची बाधा झाली असून, त्यात दोन युवतींचा मृत्यू झाल्याकडे मुतडक यांनी लक्ष वेधले.

शिवसेनेचे संतोष मुतडक यांनी राजूर ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करून ग्रामपंचायत सरपंचासह सर्व सदस्यांनी राजीनामे द्यावेत. राजूर इथं अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाल्याने काविळीची साथ पसरली. चारशे जणांना काविळीची बाधा झाली असून, त्यात दोन युवतींचा मृत्यू झाल्याकडे मुतडक यांनी लक्ष वेधले.

आजही काविळीचे रुग्ण आढळत असून, साथीतील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. गोरगरीब कुटुंबातील रुग्ण कावीळ आजाराने रुग्णालयात (Hospital) असून लाखो रुपयांचे मेडिकल बिल त्यांना भरावे लागत आहे. अजूनही रुग्ण संख्या वाढत असून यास जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असून ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा घणाघात संतोष मुतडक यांनी पत्रकार परिषदेत केला.

राजूरमधील काविळीच्या साथीमागे प्रशासनाचा गैरकारभार कसा जबाबदार आहे, याच्या पुराव्यासह निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नाशिक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून दिल्याचे मुतडक यांनी सांगितले.

काविळीचा आजार पसरविण्यास ग्रामपंचायत कारणीभूत असल्याच्या आरोपांचा संतोष मुतडक यांनी पुनरुच्चार करत, वीस वर्षांच्या प्रियंका शेंडेचा मृत्यू झाल्याने संबंधितांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. गेले तीन वर्षांपासून राजूर गावात केलेल्या सर्व विकास कामांचा पंचनामा करण्यासाठी SIT स्थापन करून चौकशी करून कारवाई करावी, अशीही मागणी संतोष मुतडक यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT