Bhandara News : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात मंगळवारी (दि.25) एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.यानंतर पुण्यासह राज्यभरात संतापाचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे.यामुळे एकीकडे महायुती सरकार आणि पोलिसांवरचा दबाव वाढतच चालला आहे. अशातच सरकारमधील जबाबदारी व्यक्ती असलेल्या मंत्र्यांकडून स्वारगेट घटनेबद्दल भाष्य करतानाच धक्कादायक विधानं केली जात आहे.गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्यानंतर आता गृहराज्यमंत्री व भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी गुरुवारी (ता.27) धक्कादायक विधान केलं आहे.त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.मंत्री संजय सावकारे म्हणाले,देशात म्हणाल तर अशा घटना घडत असतात.कारवाई सातत्यानं चालूच राहते.महिला असो की पुरुष असो सगळे सुरक्षित राहायला हवेत.फक्त महिला किंवा पुरुष सुरक्षित राहिल्या पाहिजे असं नाही.तर सगळा समाज सुरक्षित राहिले पाहिजेत, याचहेतूनं कुठलंही सरकार प्रयत्न करत असते,असं विधान केल्यामुळे सावकारे यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही,असं म्हणता येत नाही. गुन्हेगार वृत्ती कुठेना कुठे प्रत्येक ठिकाणी असते,गुन्हेगार असल्यानं या गोष्टी घडत असतात,सरकार कारवाई करण्याचं काम करत असल्याचंही गृहराज्यमंत्री व भाजप नेते संजय सावकारे यांनी म्हटलं. शिवसेना आमदार योगेश कदमांनंतर आता सत्ताधारी भाजप पक्षाच्या नेत्यानंच असं विधान केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या वक्तव्यानं देखील नवा वाद निर्माण झाला आहे. त्यादिवशी जी घटना घडली, ती घटना फोर्सफुली किंवा स्ट्रगल न झाल्यामुळं घडली.तसेच या घटनेवेळी तिथं दहा ते पंधरा लोकं बसच्या आजूबाजूला देखील उपस्थित होते. कुणालाही शंका आली नाही, त्यामुळं कदाचित क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं, अन्य माहिती आरोपी ताब्यात येईल तेव्हा माहिती होईल, असं योगेश कदम म्हणाले.
मंत्री योगेश कदम स्वारगेट बसस्थानकाची पाहणी केल्यानंतर त्यांनी परिस्थितीचा आढावाही घेतला.त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना पोलिसांची बाजूही सावरल्याचेही पाहायला मिळालं होतं.स्वारगेटमधील घटना शांततेत घडली.पीडित तरुणी ओरडली का नाही? असा सवाल आमदार योगेश कदम यांनी केला आहे.
स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेच्यावेळी जबरदस्ती,हाणामारी किंवा आरडाओरडा झालेला नाही. जे काही घडले ते सर्व काही शांततेत झाले.त्यावेळी बसच्या जवळपास 10 ते 15 जण बसच्या आसपास उभे होते. कोणालाही त्याची शंका आली नाही. त्यामुळे कदाचित आरोपीला कृत्य करण्यास आधार मिळाला.आरोपीला अटक केल्यानंतर चौकशीत अधिक माहिती मिळेल,असे आश्चर्यकारक विधान गृहराज्यमंत्री व शिवसेना आमदार योगेश कदम यांनी केले होते.या विधानानंतर त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.