Datta Gade Arrested : 'मला प्रचंड भूक लागलीय, जे काही केलंय, त्याचा पश्चाताप होतोय...,भेदरलेला दत्ता गाडे नातेवाईकांजवळ ढसाढसा रडला....

Swargate Rape Case Breaking Update : स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे हा थेट गावी गुनाटला गेला होता. मंगळवारी रात्रभर तो घरी होता. मात्र, बुधवारी सकाळपासून वृत्तवाहिन्यांवरून त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होताच गाडे याने घरातून पळ काढल्याचे पुढे आले होते.
Datta Gade
Datta GadeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे स्वारगेटसारख्या गर्दीच्या ठिकाणी मंगळवारी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर संपूर्ण पुणे शहर हादरलं होतं. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या अटकेसाठी पोलिसांची 13 पथकं आणि 200 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.त्याच्या गुनाट गावी तो लपल्याचा संशय पोलिसांना होता. उसाच्या शेत पिंजून काढल्यानंतरही त्याला शोधण्यात पोलिसांना अपयश आलं होतं. अंधार पडल्यामुळे अन् परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं ही पोलिसांना परत येण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.पण मध्यरात्री गाडेला पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं बेड्या ठोकल्या.

संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेवरुन तीव्र संतापाची लाट उसळल्यानंतर सरकार आणि पुणे पोलिस प्रशासनावरचा दबाव वाढत चालला होता.तसेच आरोपीचे राजकीय नेत्याच्या बॅनरवर फोटो झळकल्यानं त्याच्या राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप केला जात होता. पण मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणात आक्रमक भूमिका घेत पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि त्यांच्या पूर्ण पोलिस टीमला फ्री हँड दिला होता.

याचमुळे पोलिसांना अखेर 75 तासांच्या शोधमोहिमेला मोठं यश मिळालं आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे हा घटनेनंतर त्याच्या गुनाट या शिरुर तालुक्यातील गावी गेला होता.तसेच तो मंगळवारी दुपारपर्यंत गावातच होता.तसेच या काळात तो एका कीर्तनालाही गेल्याचं समोर आलं होतं.मात्र माध्यमांमध्ये फोटो आणि नाव झळकू लागल्यानं तिथून तो पसार झाला.

Datta Gade
Swargate Rape Case Update ; मंगळवारी रात्रभर गुनाटमध्ये राहिलेला दत्ता गाडे बुधवारी सकाळीच पसार झाला; 200 पोलिस मागावर, उसात लपल्याचा संशय

यानंतर दत्तात्रय गाडे दोन दिवस शिरुर तालुक्यातील गुनाट गावातील उसात लपून बसला होता. पोलिसांनी गुनाट गावात सुमारे 50 तास सर्च ऑपरेशन राबवलं.पण अंधार पडल्यामुळे आणि परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं पोलिसांना ही शोधमोहीम थांबवावी लागली.हीच संधी साधून आणि अंधाराचा फायदा घेत गाडे बाहेर आला. त्यानं रात्री बाराच्या सुमारास गावातील नातेवाईकाच्या घराचा दरवाजा ठोठावला. तिथं त्यानं प्रचंड भूक लागलीय,काही तरी खायला द्या, अशी नातेवाईकांकडे मागणी केली.यावेछळी तो प्रचंड भेदरलेला होता. तसेच यावेळी तो नातेवाईकांजवळ ढसाढसा रडला असल्याचीही माहिती समोर येत आहे.

यानंतर नातेवाईकांनी दत्ता गाडेला खायला न देता फक्त पाण्याची बाटली दिली.दत्ता गाडे यानं यावेळी नातेवाईकांना पश्चाताप झाला असल्याचं म्हटलं. तसेच जे काही केलं ते चुकीचं आहे, पोलिसांना सरेंडर व्हायचंय,असंही सांगितलं.पण त्यानंतर तो पाण्याची बाटली घेऊन निघून गेला. यानंतर याच नातेवाईकांनी ग्रामस्थांना फोन करुन या घटनेची माहिती दिली.आणि मग ग्रामस्थांनी पोलिसांना गाडेची माहिती दिली.यानंतर पोलिसांची तपास पथकं तेथे दाखल झाली अन् आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

Datta Gade
Vijay Wadettiwar Vs Yogesh Kadam: '...त्यावेळी तरुणी ओरडली का नाही?' म्हणणाऱ्या मंत्री योगेश कदमांची वडेट्टीवारांंनी लाजच काढली

स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे (Datta Gade) हा थेट गावी गुनाटला गेला होता. मंगळवारी रात्रभर तो घरी होता. मात्र, बुधवारी सकाळपासून वृत्तवाहिन्यांवरून त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होताच गाडे याने घरातून पळ काढल्याचे पुढे आले आहे. गुन्ह्याच्या वेळी त्याच्या पायात असलेले बूटही गाडेच्या गुनाटमधील घरातून जप्त करण्यात आले आहेत.

आरोपी गाडे हा एका घरात पाणी पिण्यासाठी रात्री. 11.45 च्या सुमारास आला होता. तो ज्या घरात पाणी प्यायला, त्या घरातील महिलेनं ग्रामस्थांच्या मदतीनं पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली. पोलिसांनी अवघ्या तीस मिनिटांच्या आतच गाडेला चोहोबाजूंनी घेरलं. ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडेला तू बाहेर ये, तुला घेरलंय असंही पोलिसांनी सांगितलं. अखेर कॅनालच्या खड्ड्यात लपलेला दत्ता गाडे हा बाहेर आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास हा थरार घडला. तब्बल 2 तासांपेक्षा जास्तकाळ हे सर्च ऑपरेशन सुरू होतं.यावेळी ग्रामस्थांचीही पोलिसांना मदत झााल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com