Uday Samant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti Politics : फडणवीस-शिंदे 'कोल्ड वॉर'; मंत्री सामंत म्हणाले, 'महायुतीत ठंडा-ठंडा कुल-कुल'

ShivSena Uday Samant Ahilyanagar CM Devendra Fadnavis DCM Eknath Shinde Mahayuti government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कलहावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Mumbai News : महायुती सरकारमध्ये सर्व काही अलबेल आहे, असे नाही. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये नाराज असल्याचे वारंवार समोर येत आहे.

गेल्या काही बैठकांमध्ये शिंदेंची गैरहजेरी वाढली आहे. यावरून फडणवीस-शिंदेमध्ये 'कोल्ड वॉर' सुरू असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना, 'महायुती सर्व काही ठंडा-ठंडा कुल-कुल आहे', असे म्हटले आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याच्या चर्चा निराधार आहेत. शिवजयंतीच्या कार्यक्रमात तिघेही एकत्र होते. सारे काही 'ठंडा-ठंडा, कुल-कुल आहे', हे तिघांनी स्पष्ट केले आहे". मात्र काहींची पोटदुखी आहे. त्यातून वाद असल्याच्या चर्चा घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप उदय सामंत यांनी केला.

'ऑपरेशन टायगर'वर बोलताना उदय सामंत यांनी 'ऑपरेशन टायगर' वैगेर काही नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपल्याने त्यांच्याकडे कट्टर शिवसैनिक आकर्षित होत आहे. यासाठी त्यांना रोज दोन तास द्यावे लागत आहे, असे उदय सामंत यांनी दिली.

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या वर्मी लागला आहे. त्यातून त्यांचे पोटशूळ उठले आहे. यातून शरद पवार आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी केलेल्या विरोधाचा मुद्दा बाहेर काढला. माझ्या माहितीनुसार दोन्ही पवार दुसऱ्यांच्या पक्षात असा कोणताही हस्तक्षेप करत नाही, असा टोला उदय सामंत यांनी संजय राऊत यांना लगावला.

लोकसभा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी त्यांच्या समाज माध्यमांवरील खात्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी केलेल्या पोस्टवरून वाद सुरू झाला आहे. यावर "छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी महापुरूषांनी महाराष्ट्र आणि देश घडवला आहे. त्यामुळे जयंतीच्या दिवशी श्रद्धाजंली वाहणाऱ्यांना महाराजांचा वारसा समजलेला नाही. यातून त्यांना राजकारण करण्याचा अधिकार राहिलेला नाही", असा टोला उदय सामंत यांनी राहुल गांधींना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT