Dhule Political News : धुळे शहर व परिसरातील नागरिकांना यंदा पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. सत्ताधारी व राज्यात सरकार असलेल्या भाजपच्या नियोजनशून्य कामामुळे हे घडते आहे. त्यांना सुबुद्धी मिळावी यासाठी शिवसेनेने एकवीरा देवी मंदिरात महाआरती केला. (Dhule people facing serious issues for drinking Water)
धुळे Dhule शहरात महापालिकेसह विविध सत्ताकेंद्रात भाजपची BJP सत्ता आहे. मात्र, पाणी, Water आरोग्य, रस्ते या सर्वच विषयांत नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. त्याबाबत शिवसेना (ठाकरे गट) Shivsena आंदोलन करीत आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे मंदिरात आदिशक्ती श्री एकवीरा देवीला साकडे घालून पाऊस होऊ दे, सत्ताधारी राज्य सरकारला सुबुद्धी येऊ दे, असे साकडे घालण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकदेखील त्यात सहभागी झाले होते.
मुबलक पाणी असतानाही सत्ताधारी भाजप व महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सुयोग्य नियोजनाचा अभाव दिसतो. ठिकठिकाणी गळत्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होताना दिसते. याविरोधात विविध पक्षांनी आंदोलने केली. तरीही योग्य पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे पाण्यासारख्या गंभीर विषयाबाबत असंवेदनशीलपणा सहन केला जाणार नाही.
नियोजनाअभावी कोठेही पाण्याची नासाडी होताना निदर्शनास आल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलनातून जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारू, जनहितासाठी पिण्याच्या पाणीप्रश्नी कटिबद्ध राहू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात आहेत. या स्थितीचा परिणाम विविध घटकांवर होऊन जिल्ह्याच्या अर्थचक्रावर परिणाम दिसत आहे. शेतकऱ्यांचे पीक हातून गेले. अनेक जलसाठे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यावर टंचाईचे सावट आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतातरी परतीचा समाधानकारक पाऊस होऊ दे, अशी प्रार्थना करीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने आदिशक्ती श्री एकवीरा देवीला साकडे घातले आणि सामुदायिक महाआरती केली.
जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, देवीदास लोणारी, भरत मोरे, विधानसभा संघटक ललित माळी, प्रफुल्ल पाटील, गुलाब माळी आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.