Sujay Vikhe Ultimatum Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Parner drug link : मुख्यालयातून 20 कोटींचं ड्रग्ज गायब! 'एलसीबी'चा प्रताप, पारनेर लिंकवर संशय; सुजय विखेंचा एसपींना 'अल्टीमेटम'

Shrirur Drug Case : Sujay Vikhe Ultimatum to Ahilyanagar SP Somnath Gharge : अहिल्यानगर पोलिस मुख्यालयातून लंपास करण्यात आलेल्या ड्रग्जचे पारनेर कनेक्शन सांगत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी खळबळ उडवून दिली.

Pradeep Pendhare

Shrirur drug case : अहिल्यानगर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी श्यामसुंदर गुजर याने जप्त केलेल्या ड्रग्ज मुख्यालयातील गोदामातून काढून ते परस्पर विक्री करण्याच्या प्रकारावर, भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पारनेर कनेक्शन सांगून खळबळ उडवून दिली.

'पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पुढील आठ दिवसात, याप्रकरणाशी निगडीत असलेल्या सर्व आरोपींची, आरोपींने या प्रकरणात इतर कोणाशी असलेल्या लिंक जनतेसमोर मांडव्यात, अशी मागणी करताना, तसं न केल्यास मी पत्रकार परिषद घेऊन, त्यांची नावासहीत माहिती समोर मांडले, अन् त्यात पोलिस अधीक्षकांना कारवाई करावी लागेल,' असा अल्टीमेटम दिला आहे.

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी, खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या होम ग्राऊंडकडे, पारनेरकडे थेट संकेत करत ड्रग्ज प्रकरणाबाबत गंभीर आरोप केले. ते म्हणाले, 'मला आश्चर्य वाटते की, प्रत्येक गोष्ट पारनेर तालुक्याशी का जोडली जाते. जो कर्मचारी, अटकेत झालेला आहे, तो यापूर्वी कोणत्या पोलिस ठाण्यात कार्यरत होता, याची माहिती घेतली पाहिजे. तो व्यक्ती पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. तिथं कार्यरत असताना, तिथं तो गुटखा अन् इतर व्यवसायावर आरोप निष्पन्न झाले होते. त्यावर कारवाई देखील झाली होती. असे असल्यावर देखील, पारनेर पोलिस ठाण्याहून अहिल्यानगर 'एलसीबी'मध्ये बदली होते.'

'यावर पहिला माझा प्रश्न आहे की, ही बदली झाल्याचं! याचं उत्तर पोलिस अधीक्षकांना द्यावा लागेल. पोलिस अधीक्षकांनी सांगितलं होत की, अतिशय पारदर्शक अन् चारित्र्य संपन्न लोक 'एलसीबी'मध्ये घेतले जातील. ही व्यक्ती पारनेरमधून आले होते, ते कोणाच्या शिफारशीने आले होते, त्याचे उत्तर त्यांनी द्यावं,' असे भाजपचे (BJP) सुजय विखे पाटील यांनी मागणी केली.

ड्रग्ज कोणाच्या घरी ठेवलं

'ड्रग्ज गायब झाले, ते पारनेर तालुक्यातील कोणाच्या घरी ठेवले गेले होते, त्या घरांची नावं, देखील जाहीर झाले पाहिजेत. नाव मला माहिती आहेत. पण पोलिस अधीक्षकांनी ते जाहीर केले पाहिजेत. पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते दोन लोकं कोणाचे कार्यकर्ते आहेत, हे सुद्धा तालुका ओळखून आहे, तरी पोलिसांनी त्यांची नावे सांगितले पाहिजे,' असेही सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

पोलिस अधीक्षक अल्टीमेटम...

'हा घटनाक्रम घडल्यानंतर, पोलिस अधीक्षक कार्यालयात कोण अर्धा तास बसून राहिले, त्याचा पण खुलासा झाला पाहिजे. यात अनेक मोठे मासे आहे. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. जो कोणी पाठबळ देत असेल, ते जनतेत हळू हळू खुले होतील. मी आठवडाभराचा वेळ देतो, अहिल्यानगर पोलिस दलाला, अन्यथा पत्रकार परिषद घेऊन, नावासहीत हा सर्व खुलासा करणार, कोण-कोणाच्या घरी माल ठेवला होता, कोण कोणाचे कार्यकर्ते आहेत, हे सर्व खुलं करणार, याचं उत्तर पोलिस अधीक्षकांनी द्यावं,' अशी आमची प्रमुख मागणी सुजय विखे पाटील यांनी केली.

पारनेरशी लिंक कशी?

सिस्पे घोटाळा, ड्रग्ज प्रकरण, हे सर्व कुठेतरी पारनेरशी लिंक आहेत, पोलिस अधीक्षक कुठेतरी कोणाला तरी, पाठीशी घालत आहे का? यावर सुजय विखे पाटील म्हणाले, "पोलिस अधीक्षक आपापले काम करत आहेत. पण पोलिस अधीक्षकांनी एवढं मोठं 20 कोटीचं रॅकेट खुलं झाले आहे, श्रीरामपूरमध्ये हे सर्व ड्रग्ज पकडले गेले, तर या पोलिस कर्मचाऱ्याने तिथं दहा किलोचा मैदा ठेवून, तेथून दहा किलोचे ड्रग्ज बाहेर काढले, असे तर हुशार लोकं आहेत. पोलिस जर यात पारदर्शक काम करत आहेत, तर पोलिस अधीक्षकांनी प्रेस घेऊन या सर्व गोष्टींचा खुलासा करणे अपेक्षित आहे. पोलिसांनी पोलिसांची भूमिका बजावावी, कोणतेही नाव पडद्याआड न ठेवता ते समोर आणावते."

सीडीआर रेकाॅर्ड तपासा

'सर्व आरोपी आहेत, असे मी म्हणत नाही. पण 'एलसीबी'मध्ये घेतलेला कर्मचारी, कोणाच्या शिफारशीवरून घेतला, हे समोर आलं पाहिजे. जेवढे आरोपी आहेत, त्यांची सीडीआर रेकाॅर्ड तपासावे, हे कोणाच्या संपर्कात होते, ते जनतेसमोर आलं पाहिजे,' अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली.

त्या खटल्यावर भाष्य

नीलेश लंके यांचे बंधू, आणि त्यांचे सहकाऱ्यांविरोधात विनयभंग अन् अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. यावर बोलताना, सुजय विखे पाटील म्हणाले, "न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून, समोरं गेलं आहे. यामध्ये पळून जाण्याची आवश्यकता नाही. याचिकाकर्ती, गर्भवती होती. हा प्रकार लोकसभेच्या निकालाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी घडलेली घटना होती. पण, साधारण या घटनेला दोन वर्षे उलटले आहेत. न्याय व्यवस्थेने निकाल दिला आहे. त्याच आमचा कोठेही सहभाग नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT