Nagar News : नगर जिल्ह्यामध्ये विविध शासकीय अभिलेखांमध्ये कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातींच्या सुमारे 1 लाख 47 हजार नोंदी आढळून आलेल्या आहेत. या नोंदींच्या आधारे सर्व पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र वाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे. (Special campaign for distribution of 1 lakh 47 thousand Kunbi-Maratha caste certificates in Nagar)
मोठ्या प्रमाणात सापडलेल्या या नोंदींच्या आधारे तातडीने जात प्रमाणपत्रे वाटप करण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयांमार्फत २६ ते ३० जानेवारीदरम्यान विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ही विशेष मोहीम राबविण्यापूर्वी २१ ते २५ जानेवारी या कालावधीत गाव पातळीवर त्या गावांमध्ये आढळून आलेल्या नोंदींची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे संबंधितांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करता येतील. पात्र व्यक्तींनी कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या जातीच्या प्रमाणपत्रासाठी या विशेष शिबिरांमध्ये कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन नगर जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सर्वेक्षणासाठी प्रगणक, पर्यवेक्षकांची नेमणूक
दरम्यान, राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरिता नगर जिल्हा प्रशासनातर्फे सुमारे १० हजार ३२५ प्रगणक व सुमारे ७५० पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. हे सर्वेक्षण मोबाईल प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
या प्रगणकांना प्रशिक्षण देण्याकरिता प्रत्येक तालुक्यातील तसेच नगर महापालिका व कटक मंडळातील तालुकास्तरीय, वार्डस्तरीय प्रशिक्षक नेमले आहेत. या प्रशिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. या प्रशिक्षणास गोखले इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षक सिद्धांत कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
आज (ता. २१) आणि उद्या (ता. २२ जानेवारी) तालुकास्तरीय, वॉर्डस्तरीय प्रशिक्षकांकडून सर्व प्रगणकांना व पर्यवेक्षकांना या सर्वेक्षणाच्या मोबाईल प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण हे तालुक्याच्या ठिकाणी होत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वेक्षणाचे कामकाज सुरु करण्यात येणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाकरिता आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे. तसेच, त्यांना सर्वेबाबत आवश्यक माहिती पुरवावी. कुटुंबाचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर या कुटुंबाच्या घरावर चिन्हांकन करण्यात येणार आहे, असेही नगर जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.