PWD Contractors with Supd. Engr. Arundhati Sharma Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे सरकारपुढे पेच...कंत्राटदार घालणार घेराव?

राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडण्याच्या नादात अडचणीत सापडले

Sampat Devgire

Contractor crisis : गेले दोन वर्षे राजकीय तोडफोडीसाठी सातत्याने `विकास`शब्दाची ढाल करण्यात आली. त्यासाठी वारेमाप घोषणा करण्यात आल्या. मात्र तिजोरीत खडखडाट असल्याने प्रत्येक जिल्ह्यात कामांची मंजुरी ६०० कोटींची निधी मात्र ३० कोटींची अशी स्थिती झाली. त्यामुळे आता नवा रस्ता तर दूररस्त्यावरचा एक खड्डाही बुजवणार नसल्याची घोषणा कंत्राटदारांनी केल्याने आमदार आणि त्यांचे सरकार दोन्ही अडचणीत सापडले आहे. (State Government found in trouble with his own financial missmanagement)

राज्यभरातील (Maharashtra) कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) विरोधात आंदोलन करीत आहे. तीन दिवसांच्या धरणे आंदोलनानंतर राज्यभरातील हे कंत्राटदार आता मंत्रालयावर (Mumbai) हल्लाबोल करणार आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

काम पूर्ण करुनही दोन वर्षांपासून बिले प्रलंबित असलेल्या ठेकेदारांनी तीन दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागासमोर सुरु केलेल्या आंदोलनाची दिशा आता मंत्रालयाकडे वळली आहे. येत्या ता. २६ व २७ जुलै रोजी मंत्रालयासमोरील आझाद मैदानावर आंदोलनाचा निर्णय या ठेकेदारांनी घेतला असून, त्यात राज्यातील ठेकेदार सहभागी होतील.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन करीत होते. या आंदोलनाकडे आमदार, खासदारांसह नेत्यांनी अक्षरश: पाठ फिरवली. त्याबाबत या ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा यांनी बुधवार आंदोलनस्थळी जावून निवेदन स्विकारले.

त्यांचे प्रश्न समजून घेत नाशिक जिल्ह्यातील ठेकेदारांच्या प्रश्नांबाबत सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. दरजान, जिल्ह्यातील ठेकेदारांचे ५८७ मजूर करण्याचा सपाटा आजही सुरुच आहे.

त्यामुळे दरवर्षी दायित्वाचे प्रमाण वाढत असल्याने या ठेकेदारांनी केलेल्या कामांचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा संपूर्ण राज्यातील ठेकेदारांचा प्रश्न असल्याने सर्व जिल्ह्यातील ठेकेदार आता मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष विजय बाविस्कर यांनी सांगितले.

यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील, अभय चोकसी, राहुल सूर्यवंशी, रमेश शिरसाठ, संजय आव्हाड, शशिकांत आव्हाड, अजित सकाळे, जी. जी. काटकर, प्रशांत सोनजे, योगेश पाटील, संदीप दरभोडे, राजू कुर्हाडे, महेंद्र पाटील, राजेंद्र मुथा, सुधाकर मुळाणे, विलास निफाडे, प्रकाश बनकर आदी सहभागी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT