Jayant Patil On Raju Shetty : पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटना ऊसदराबाबत आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रश्नावर आंदोलन करण्याची गरज राहिलेली नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. (Jayant Patil said, Now Sugarcane price is fixed unanimously)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शेतकरी (Farmers) प्रश्नावर आंदोलन सुरू केले आहे. आज नाशिकमध्ये (Nashik) त्यांचे आंदोलन होत आहे. याबाबत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारवर टीका केली.
राजू शेट्टी तसेच शेतकरी संघटनांनी उसाच्या दराबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. सातारा जिल्ह्यात या विषयावर आंदोलन सुरू आहे. याबाबत पाटील म्हणाले, उसाला भाव निश्चित केलेला आहे. त्याबाबत यापूर्वीदेखील चर्चा झालेली आहे. त्यामुळे कोणालाही आंदोलन करण्याची गरज नाही.
या वेळी त्यांनी नाशिक विभागातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात येत असल्याचे सांगितले.
या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, लाखो रुपयांचे पीक वाया गेलेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. या संकटात राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना विशेष पॅकेज द्यावे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यांना जाहीर केलेले अनुदान आलेले नाही. काही भागात ३५० रुपये अनुदानाची घोषणा केली होती. मात्र, अद्याप ती शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही. हा सरकारच्या गलथान कारभाराचा नमुना आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, यासाठीच आम्ही आज नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा काढतो आहे. राज्यात सध्या प्रचंड दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते आहे. टंचाईचा सामना करावा लागतो आहे. काही भागात टँकर सुरू आहेत, काही भागात सुरू केलेले नाहीत, त्याचबरोबर चारा टंचाईदेखील आहे. या सगळ्या प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.