Suhas Kande & Sameer Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nandgaon APMC election : समीर भुजबळ आमदार सुहास कांदे यांची कोंडी करतील?

आमदार सुहास कांदे यांच्या भावी वाटचालीत नेत्यांनी उभा केला मोठा अडथळा

Sampat Devgire

Suhas Kande v/s Bhujbal politics : ग्रामपंचायत, सोसायट्या ज्या ताब्यात बाजार समित्या त्यांच्या हाती हा संकेत आहे. हे मतदार म्हणजे गावगाडा हाकणारे नेतेच असतात. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक आमदारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असते. त्यात शिंदे गटाचे बहुचर्चीत आमदार सुहास कांदे यांना थेट माजी खासदार समीर भुजबळ यांनीच आव्हान उभे केल्याने अनपेक्षीतपणे कांदे यांची दमछाक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Eknath Shinde group`s pre assembly election trial in Nandgaon APMC)

नांदगाव (Nandgaon) मतदारसंघातील नांदगाव आणि मनमाड या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुका (APMC election) अत्यंत चुरशीच्या बनल्या आहेत. शिंदे गटाचे (Eknath Shinde) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) जे जे करतील त्यापेक्षा एक पाऊल पुढे असे धोरण विरोधकांचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पॅनेलने, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अत्यंत नियोजनबद्ध आव्हान निर्माण केल्याचे चित्र आहे.

आमदार कांदे यांनी आपल्या मतदारसंघात एक दरारा निर्माण केला आहे. सत्ताधारी एकनाथ शिंदे गटात जाऊन त्यांनी त्याला सत्तेचा आर्शिवाद प्राप्त करून घेतला. त्यातून कोट्यावधीच्या विकास योजना राबवणार असा एक संदेश ते कार्यकर्ते, मतदारांपुढे सातत्याने मांडतात. या सगळ्यांचे एकत्रीत चित्र म्हणजे आमदार कांदे यांचे राजकारण होय. हे राजकारण किती खरे, किती तकलादू याची परिक्षा मनमाड व नांदगाव बाजार समित्यांच्या निवडणुका आहेत.

प्रारंभापासूनच आमदार कांदे यांनी या निवडणुका अत्यंत गांभिर्याने घेतल्या होत्या. त्यात त्यांचा हुकमी एक्का म्हणजे बापूसाहेब कवडे होते. यंदाच्या निवडणुकीत माघारीच्या दोन दिवस आधी अचानक कांडी फिरली व श्री. कवडे यांची चिरंजीव तेज कवडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यातून तालुक्यातील मतदारांत वेगळाच संदेश गेला आहे. अशीच स्थिती मनमाड बाजार समितीत देखील झाली. त्यामुळे आमदार कांदे यांना एकहाती ही निवडणूक लढवावी लागत आहे. पॅनेलमधील उमेदवार व नेत्यांची सर्व जबाबदारी आमदार कांदे यांच्यावरच आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

श्री. कांदे यांच्या विरोधात शिवसेनेने दंड थोपडले आहेत. शिवसेनेचे नेते व कांदे यांचे प्रतिस्पर्धी गणेश धात्रक यांनी मनमाड बाजार समितीत उमेदवारी केली आहे. त्यामुळे त्यांचा डोळा बाजार समितीच्या निमित्ताने मनमाड नगरपालिका व विधानसभा निवडणूक असेल. बाजार समितीत कांदे यांनी त्यांना रोखने त्यामुळेच गरजेचे आहे. त्यादृष्टीने आमदार कांदे यांनी दिवसारात्र प्रचारात झोकून दिले आहे.

नांदगाव तालुक्यातील दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकीत सर्व कांदे विरोधक एकत्र आले आहेत. त्यात पंकज भुजबळ, अनिल आहेर, संजय पवार, राजेंद्र देशमुख आणि जगन्नाथ धात्रक हे पाच आमदार आहेत.

बापूसाहेब कवडे यांची अदृष्य साथ कांदे विरोधकांना मिळेल अशी चर्चा आहे. शेवटच्या टप्प्यात जे जे करावे लागते ते सर्व दोन्ही पॅनेलने केले आहे. मतदारांना सहलीला नेले आहे. त्यांना तीर्थप्रदास दिला जात आहे. त्यात कांदेंपेक्षा आपला प्रसाद मोठा कसा राहील याची दक्षता विरोधक करीत आहेत. त्याचे सुक्ष्म नियोजन व रसद राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून होत आहे. त्यामुळे एक प्रकारे श्री. भुजबळ विरूद्ध कांदे असे या निवडणुकीचे स्वरूप आहे. त्यात आमदार कांदे यांची दमछाक करण्याचे जोरदार प्रयत्न विरोधकांकडून होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय आहे.

बापूसाहेब कवडे यांची अदृष्य साथ कांदे विरोधकांना मिळेल अशी चर्चा आहे. शेवटच्या टप्प्यात जे जे करावे लागते ते सर्व दोन्ही पॅनेलने केले आहे. मतदारांना सहलीला नेले आहे. त्यांना तीर्थप्रदास दिला जात आहे. त्यात कांदेंपेक्षा आपला प्रसाद मोठा कसा राहील याची दक्षता विरोधक करीत आहेत. त्याचे सुक्ष्म नियोजन व रसद राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून होत आहे. त्यामुळे एक प्रकारे श्री. भुजबळ विरूद्ध कांदे असे या निवडणुकीचे स्वरूप आहे. त्यात आमदार कांदे यांची दमछाक करण्याचे जोरदार प्रयत्न विरोधकांकडून होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT