Sameer Bhujbal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manmad APMC result : शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचे पानिपत!

मनमाड बाजार समितीत १४ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ ठरले किंगमेकर.

Sampat Devgire

Manmad APMC Result : नांदगाव बाजार समितीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना तो आनंद चोविस तासही साजरा करता आला नाही. आज झालेल्या प्रतिष्ठेच्या मनमाड बाजार समितीतील त्यांची सत्ता गेली. महाविकास आघाडीने चौदा जागा जिंकत परिवर्तन घडवले. कांदे यांना तीन जागा मिळाल्या. (Shivsena MLA Suhas shinde lost Manmad APMC today)

प्रतिष्ठेच्या मनमाड (Nandgaon) बाजार समितीच्या निवडणुकीचा (APMC election) निकाल आज जाहीर झाला. त्यात छगन भुजबळ (Chhagan Bhubal) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) १४ जागा जिंकल्या. आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना तीन तर एका जागेवर अपक्ष विजयी झाला. त्यामुळे मनमाड बाजार समितीतील कांदे यांची सत्ता खालसा झाली.

या निवडणुकीत माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार संजय पवार, माजी आमदार अनिल आहेर, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलला अपक्षांसह १४ जागा, शिंदे गट ३ तर हमाल मापारी गट अपक्ष १ जागा मिळाली आहे.व्यापारी गटातील २ अपक्ष उमेदवार यांनी समीर भुजबळ यांची भेट घेऊन परिवर्तन पॅनलला पाठिंबा जाहीर केला असल्याने भुजबळांच्या नेतृत्वाखालील निवडून आलेल्या उमेदवारांची एकूण संख्या १४ झाली आहे.

विजयी झालेले उमेदवार असे, सहकारी संस्था : सर्वसाधारण जागा- आहेर पुंजाराम पोपट (१४७), आहेर विठ्ठल काशिनाथ (१४५), गोगड दिपक चंद्रकांत (१४९), भाबड कैलास नामदेव (१४३), मार्कंड आनंदा विठ्ठल (१४१), महिला राखीव गट : ३ कराड संगिता रमेश (१५९), पाटील चंद्रकला अशोक (१४२), इतर मागासवर्ग : पवार संजय सयाजी (१५४), विमुक्त जाती भटक्या जमाती गट : धात्रक गणेश जगन्नाथ (१६३), ग्रामपंचायत गट : सर्वसाधारण जागा - उगले सुभाष जयराम (१०५), बिडगर गंगाधर हरी (११४), आर्थिक दुर्बल घटक - कदम योगेश दुर्योधन (१०५), व्यापारी गट : बंब किसनलाल कन्हैयालाल (६९), हमाल व तोलारी गट : उगले मधुकर पांडुरंग (७४).

शिवसेना शिंदे गट : सहकारी संस्था : सर्वसाधारण जागा- कुणगर आप्पा पांडुरंग (१३९), लहाने किशोर कचरू (१५२), अनुसुचित जाती व जमाती गट - लहिरे दशरथ बबन (१०७). अपक्ष - ललवाणी रूपेशकुमार रिखबचंद (७६).

या निवडणुकीतील सर्व सूत्र ऐनवेळी समीर भुजबळ यांनी हातात घेतली. त्यांनी या निवडणुकीत अतिशय सूक्ष्म असे नियोजन केले. त्यामुळे महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलला भरघोस यश मिळाले असल्याने या विजयाचे किंगमेकर हे माजी खासदार समीर भुजबळ हेच ठरले आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत एकहाती सत्ता मिळवू असे म्हणणाऱ्या आमदार सुहास कांदे यांना मतदारांनी चांगलाच दणका दिला असून या निवडणुकीत त्यांचं पूर्णतः पाणीपत झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT