Ravindra Mirlekar at Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena On BJP : शिवसेनेला दगा करणाऱ्या भाजपला शिवसैनिक मातीत गाडतील!

The frightened BJP government lost sleep over the fear of Uddhav Thackeray-शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी भाजपच्या कारभाराचा पंचनामा करीत, त्यांना हद्दपार करण्याचे आवाहन केले.

Sampat Devgire

Ravindra Mirlekar on BJP Government : भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर स्वतः नाशिकच्या राजकीय मैदानात उतरले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा येथील ‘होऊ दे चर्चा’ उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. (BJP Wants to destroy the future of youth by doing contract recruitment, stop them in time)

शिवसेनेतर्फे (Shivsena) आज नाशिक रोडला (Nashik) ‘होऊ दे चर्चा’ अभियानाला प्रारंभ झाला. या वेळी राज्यातील भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारच्या कारभारावर या नेत्यांनी टीका केली.

शिवसेनाप्रमुखांच्या मदतीने भाजपची कमळाबाई महाराष्ट्रभर विस्तारली. मात्र, वेळ येताच तिने आपले विक्राळ रूप दाखवून शिवसेनाच संपवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना कार्यकर्ते येत्या निवडणुकीत या भाजपला त्यांची खरी जागा दाखवतील, असा इशारा शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी दिला.

या वेळी मिर्लेकर यांनी भाजपचे विखारी धोरण, समाजात फूट पाडण्याचा अजेंडा आणि सहकारी पक्षांना संपवण्याचे धोरण यावर प्रखर शब्दांत टीका केली. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांचे भाजपचे सरकार सत्तेत आले, तेव्हा २०१४ मध्ये देशावर ५२ हजार कोटींचे कर्ज होते, ते आज १ लाख ३६ हजार कोटी झाले आहे. सामान्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर केलेल्या पंतप्रधान मोदी यांनी जनतेसाठी काय केले?, कोणता विकास केला?, तुम्हाला हा विकास दिसतो आहे का?. दिसत नसेल तर जागे व्हा, देशाला संकटाकडे नेणारे हे सरकार पराभूत करा.

ते म्हणाले, आता सर्वच क्षेत्रात खासगीकरण म्हणजे पेन्शनचा मुद्दा राहत नाही. शेतीमालाला हमीभाव द्यायचा नाही. ज्या मालाला बाजारपेठेत जास्त भाव असेल, तेवढा माल आयात करून शेतकऱ्यांचे कंबर मोडायचे. कंत्राट पद्धतीने नोकरभरती करून सरकार ठेकेदार झाले आहेत. गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यातील ६४ हजार सरकारी शाळा बंद करण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे सरकार उद्योगपतींसाठी खासगीकरण करीत सुटले आहे. समाज उद्ध्वस्त होण्याआधी त्यांना घरी बसवावेच लागेल.

या वेळी समन्वयक संगीताताई खोदाना, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड या प्रमुख नेत्यांनी नागिरकांना मार्गदर्शन केले.

माजी नगरसेवक प्रशांत दिवे, मंगला आढाव, दिनकर अप्पा आढाव, ज्योती गोडसे, मंदा गवळी, भरातीताई ताजनपुरे, योगिता गायकवाड, सीमा ताजने, विभागप्रमुख गणेश गडाख, कुलदीप आढाव, योगेश नवसे, नितीन चिडे, योगेश गाडेकर, चिमा डावखर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT