Ganesh Sugar Factory Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Political News: गणेश सहकारी कारखाना : कोल्हेंच्या भूमिकेकडे लक्ष, विखे-पाटलांसोबत जाणार की विरोधात दंड थोपटणार !

Ganesh Sugar Factory Election: गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे विवेक कोल्हे यांची भूमिका महत्वाची ठरण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar : राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी 15 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. तब्बल 106 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. आज या अर्जाची छाननी पार पडली. त्यानंतर आता 17 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं असून विविध गट जोरदार तयारी करत आहेत. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलविरोधात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या युतीमधील पॅनलमध्ये ही निवडणूक होण्याची चिन्हं आहेत. मात्र, यामध्ये भाजपचे विवेक कोल्हे यांची भूमिका महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.

विवेक कोल्हे हे नगर जिल्हा बॅंकेचे संचालक आणि कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन आहेत. त्यामुळे गणेश कारखान्याच्या निवडणुकीत विवेक कोल्हे हे विखे पाटलांच्या पॅनलला पाठिंबा देणार की थोरात-पवार यांच्या युतीतील पॅनलला पाठिंबा देतात, यावर 'गणेश'च्या निवडणुकीची पुढील गणितं ठरू शकतात.

या निवडणुकीत विवेक कोल्हे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या तरी याबबात कोणीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण येत्या काही दिवसांत कोण-कोणाला पाठिंबा देतं ते स्पष्ट होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता गणेश कारखान्याची निवडणूक महत्वाची मानली जात आहे.

गणेश सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री शंकर कोल्हे आणि शिवाजीराव कोते पाटील यांच्या पॅनलचं गेली अनेक वर्षे वर्चस्व होतं. पण गेल्या काही कालावधीपासून कारखाना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली आहे.

दरम्यान, शिर्डी, संगमनेर आणि कोपरगाव मतदारसंघातील काही गावे गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतात. त्यामुळे कारखान्याची निवडणूक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी 15 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुदत 15 ते 19 मे पर्यंत होती. तर 22 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननीची प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख होती.

त्यानंतर आता वैध उमेदवारी अर्जांची सूची 23 मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. याबरोबरच 23 मे ते 6 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 7 जूनला वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करत उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येईल. तसेच 17 जून 2023 ला मतदान पार पडेल. 19 जूनला मतमोजणी होईल.

(Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT