Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News: आगामी निवडणुका जिंकाव्याच लागतील!

Sampat Devgire

धुळे : (Dhule) राज्यातील (Maharasahtra) सत्ताधारी केवळ घोषणा करण्यात दंग आहेत. शेतकरी (Farmers) अडचणीत आहे. त्यांच्याकडून जनतेच्या प्रश्नांवर एव्हढी उदासीनता आहे की, सामान्यांचे प्रश्न तीव्र बनले आहे. विरोधकांना अडचणीत लोटण्यासाठी सत्तेचा गैरव्यापर होत आहे. त्यामुळे आपल्याला होणारा त्रास कमी करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुका आपल्याला जिंकाव्याच लागतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केले. (Eknath Khadse appeal party workers to organise for assembly election)

दोंडाईचा येथे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक सौरभ मंगल कार्यालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, डॉ. हेमंतराव देशमुख, आमदार अनिल पाटील, संदीप बेडसे, निरीक्षक अर्जुन टिळे, संदीप बेडसे, रामकृष्ण पाटील, किरण शिंदे उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मतभेद कमी करून प्रामाणिकपणे काम केल्यास यश मिळू शकते. एक वर्षाचा कालावधी आहे. बूथ यंत्रणा मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे. प्रत्येक बूथवर यशदेखील मिळविणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक मजबूत स्थितीत व एका छताखाली लढवू असे सांगितले.

माजी मंत्री खडसे म्हणाले, की पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे पालन करावे लागेल. गावपातळीवर संघटना बूथ, युवक, महिला, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, संघटन पोचले पाहिजे. एवढे पूर्ण झाले तर पाच हजार कार्यकर्त्यांची फौज तयार होईल. निवडणुका वाऱ्यावर जिंकता येत नाहीत. कार्यकर्त्यांची मेहनत सतत असली पाहिजे. आपला त्रास कमी करण्यासाठी निवडणूक जिंकली पाहिजे. एकत्र राहिले तरच निवडणुकीत यश संपादन करता येईल म्हणून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले.

आमदार अनिल पाटील म्हणाले, की निवडणूक कुठलीही असो, सैन्याची आवश्यकता असते. मावळ्यांशिवाय लढता येत नसल्याचे सांगून आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधीसाठी मेहनत घेण्याची गरज आहे. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता सत्ताधारी गोंधळलेले आहेत. त्यामुळे ते काहीही विधाने करतात. काहीही घोषणा केल्या जात आहेत. जनतेच्या खऱ्या प्रश्नांची त्यांना जाण नाही. त्याबाबत ते पुर्णतः उदासीन आहे. त्यामुळे सामान्य नागरिक सत्ताधाऱ्यांबाबत नाराज आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी तळागाळात काम करावे लागेल.

माजी आमदार रामकृष्ण पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, किरण पाटील, किरण शिंदे, अमित पाटील, ॲड. एकनाथ भावसार, ललित वारुडे, मोतीलाल पाटील, ज्योती देवरे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT