Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : घराणेशाहीचा आरोप करणारा तरी घरंदाज आहे का! उद्धव ठाकरेंची टीका...

Kopargaon Thackeray Group Meeting : शिवसेना प्रमुखांनी मोदींच्या पाठीवर हात ठेवला नसता तर ते आज दिसले नसते.

Amol Sutar

Kopargaon Political News : भगव्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भगव्याबरोबर अनेकांनी गद्दारी केली. तरीसुद्धा भगवा तेजाने फडकत आहे आणि तो असाच हजारो - लाखोंवर्षे असाच फडकत राहणार आहे. यांच्यामुळे भगव्याला काही फरक पडत नाही. ज्याच्या हृदयात भगवा असतो तो संकटांना घाबरत नाही. आता संपूर्ण देशात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा सुरु असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर केली.

कोपरगाव येथे शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली. तर कोपरगावमधून लोकसभा आणि विभानसभेला शिवसेनेचा वाघच निवडून येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून वारंवार घराणेशाहीचा आरोप सुरु असून त्यांना उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणारा तरी घरंदाज पाहिजे, अशा टोला त्यांनी लगावला आहे.

ते म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सगळीकडे घराणेशाही सांगत सुटले आहेत. कसली घराणेशाही, शिवसेनाप्रमुखांचा सुपुत्र आहे ही घराणेशाही आहे का ? तुमच्याकडे जी घराणेशाही आहे त्यामध्ये अशोक चव्हाण हे शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत, मग ही घराणेशाही नाही का ? घटनाबाह्य मुख्यमंत्री पदावर जे बसलेत ते एकनाथ शिंदे आणि त्याच कारटं आम्हीच खासदार केले. मग ती घराणेशाही नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना, काँग्रेसमधून आलेली घराणेशाही तुम्हाला चालते. अजित पवार हे सुद्धा घराणेशाहीचे प्रॅाडक्ट आहे. शिवसेनाप्रमुखांनी मोदींच्या पाठीवर हात ठेवला नसता तर ते आज दिसले नसते. ती बाळासाहेबांची घराणेशाही तुम्हाला नको आहे. हिंदुत्वाची शिवसेना तुम्हाला नको आहे. संघमुक्त भाजप, संघमुक्त भारत म्हणणारा नितीशकुमार तुम्हाला पाहिजे, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.

काँग्रेस संस्कृतीमध्ये वाढलेली मंडळी तुम्हाला चालतात आणि घराणेशाही विरोधात बोंबलताय. आहे माझे घराणे तुम्हाला काय बोलायचे ते बोला आणि त्या घराण्यावर महाराष्ट्र प्रेम करत आहे. उगाच लोक नाहीत जमत.

एकटा उद्धव नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून तुम्ही एकत्र आहात. माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणारा तो तरी घरंदाज पाहीजे. त्याच्या कुटुंबाचा नाही पत्ता आणि दुसऱ्याची घराणेशाही काढत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

आज शेतकऱ्यांची घरे उद्वस्थ होत आहेत. पिक विम्याचे पैसे मिळत नाहीत. पिकांना हमीभाव नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तुम्हाला शेतकरी फक्त निवडणुकीत मतदान करण्यापुरताच पाहिजे असतो, असा आरोप ठाकरेंनी भाजपवर केला. तर एकदा निवडून आले की सुटाबुटातील मित्रांना जवळ करण्याची भाजपची पद्धत आहे. त्यानंतर त्यांना शेतकरी दिसत नसल्याचे ते म्हणाले.

आज देशात हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असा लढा सुरु आहे. दिल्लीत शेतकरी हमीभाव आणि हक्कासाठी लढा देत आहेत. तर त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर आश्रू धूर सोडण्यात आला आहे, हा त्यांच्यावर अन्यायच आहे. या सरकारला शेतकऱ्यांची काळजी नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT