Ahmednagar News : शिर्डीतील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं शिर्डी इथं पेन्शन राज्य महाधिवेशनात, मुख्यमंत्रीपदावर पुन्हा भाष्य केलं. महाविकास आघाडीत जागा वाटपाबरोबर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा, अशी आग्रहाची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसने त्याला जास्त प्रतिसाद दिला नसला, तरी महायुतीकडून उद्धव ठाकरेंना त्यावरून चांगलच ट्रोल करण्यात आलं. आता शिर्डीत पुन्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं आहे.
सरकार बदला, असे आवाहन करताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या अधिवेशनात जुनी पेन्शन आहे, जशीच्या जशी लागू करण्याचं वचन दिलं. उद्धव ठाकरेंच्या या खेळीमुळं महायुती सरकारची कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरेंनी हे वचन देताना, महायुती सरकार कधीही काहीही करू शकते, असं म्हणत दोन महिने आहेत, निवडणुकीला. कॅबिनेटची बैठक घेतील, योजना लागू करतील. पण हे दगाफटका करण्यात माहीर असल्यानं तुम्हाला माहीत आहे. हा दगाफटका झालास, तर संपूर्ण महाराष्ट्राला होईल, अशी भीती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. पण मी तुमची मागणी मान्य करतो, तसं वचन दिलं आहे. हे वचनं देताच, सरकारला घाम फुटणार आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
शिर्डीतून उद्धव ठाकरेंनी सत्ता बदलाचं आवाहन करताना म्हणाले, "ज्यांनी माझ्याशी गद्दारी केली, ज्या शिवसेनेच्या कुशीत ज्यांचा राजकीय जन्म झाला, त्या शिवसेना (Shiv Sena) आईवर हे वार करू शकतात, ते तुमच्यावर देखील वार करू शकतात. म्हणून मला हे सरकार नको आहे. मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही पडत नव्हतं, आणि आताही नाही. मला माझा महाराष्ट्र हवा आहे". मला कोणीही सत्तेतून रिटायर्ड करू शकत नाही. मी सत्तेत असलो काय, नसलो काय, तुम्ही माझ्यासोबत आहात, त्यामुळे मी सत्तेत आहे. जनतेची सत्ता आहे, ती महत्त्वाची आहे. शिवसेनाप्रमुख कोठे सत्तेत होते, तरी देखील सत्ता त्यांच्याकडं होती. तुम्ही त्यांची सत्ता होतात, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
या महाअधिवेशनात सहभागी झालेल्या प्रत्येकांची मागणी 'एकच मिशन जुनी पेन्शन', अशी होती. उद्धव ठाकरेंनी आम्ही जाहीर करत असलेल्या योजना खऱ्या अर्थानं तुम्ही ग्राऊंड पातळीवर राबवता. महसूलची सर्वात मोठी 'महाराजस्व' योजनेत सर्व काही होते. सर्व योजना तुम्ही राबता आणि हे सरकार, 'शासन आपल्या दारी', ही योजना आणली. ती देखील तुम्हीच चालवली. आणि हे 'उपटसुंब' योजनेचं श्रेय घेत आहेत, अशी टीका केली. शेतकऱ्यांची कर्जमुक्त केली, त्याचा अभिमान आणि समाधान आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना एकही डामडौलचा कार्यक्रम केला होता का? असा सवाल करत मी माझे कर्तव्य पार पाडले. दुर्दैवांनं कोरोना आला, नाहीतर आज तुम्हाल इथं बसण्याची वेळच आली नसती, असं सांगून महायुती सरकारच्या डामडौल कार्यक्रमांवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.