Balasaheb Thorat & Dr. Radhakrishna Vikhe Paril 
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics : राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरात यांना चांगलेच सुनावले!

Vikhe-Thorat Politics- महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी बाळासाहेब थोरातांच्या टिकेला दिले खरमरीत उत्तर

राजेंद्र त्रिमुखे

Vikhe v/s Thorat Politics : नगर जिल्ह्यात विखे विरुद्ध थोरात यांच्यातील दोन-तीन पिढ्यांचा राजकीय संघर्ष राज्याला सर्वश्रुत आहे. विखे काँग्रेस पक्षात असताना सुरू झालेला हा दोन-तीन पिढ्यांचा संघर्ष आता विखे भाजप मध्ये गेल्यानंतर अधिकच उसळून आला आहे. त्यात संवेदनशीलता संपत चाललीय का? यावरही चर्चा सुरू झाली आहे. (Vikhe & Thorat politics, Vikhe Patil repiled Balasaheb Thorat had two generation political rivalry)

काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात दिवंगत नेते (कै) बाळासाहेब विखे-पाटील यांच्यावर टिपण्णी केली होती. त्यावरून महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांना थोरात यांना त्याची जाणीव करून दिली आहे.

नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्यानंतर निवडून आलेल्या सरपंच, सदस्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महसुल मंत्री विखे यांच्या संगमनेर मतदारसंघात होत असलेल्या कथित दडपशाहीचे अनेक दाखले दिले होते.

यावेळी बोलताना श्री. थोरात यांनी ३५-४० वर्षे खासदार राहिलेल्यानी काय विकास केला, असे वक्तव्य केले होते. आता थोरात यांच्या याच वक्तव्यावर राधाकृष्ण विखे-पाटील चांगलेच नाराज झाल्याचे दिसून येत आहे.

यासंद्रर्भात राधाकृष्ण विखे यांनी काहीसे भावनिक होत, आज जो माणूस हयात नाही त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही असे सांगून थोरात यांच्या यासंदर्भातील वक्तव्याचा निषेध केला आहे. मलाही त्यांच्या पिताश्रीं बद्दल बोलता येते. मग आम्ही हे सांगायचे का की, संगमनेर साखर कारखान्याचे संस्थापक पद्मश्री विखे होते. आज तुम्ही दुसरेच संस्थापक तयार केले आहेत, असे सांगून त्यांनी थोरतांच्या टिकेची परतफेड केली.

ते पुढे म्हणाले, आम्हालाही बरेच काही बोलता येईल. पण आपण एका वेगळ्या संस्कृतीत तयार झालेलो आहोत. संघर्ष आपला आहे. त्यात जुन्या लोकांना त्यात ओढून तुम्ही काय साध्य करणार आहात. यातून आपण आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहात. नाचता येईना अंगण वाकडे अशी आपली अवस्था झाली आहे, अशी खरमरीत टीका राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT