Newasa Assembly Constituency Result : नेवासा विधानसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना, अशा सामन्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने विजय मिळवला. भाजपमधून ऐनवेळेला शिवसेना पक्षात प्रवेश करून निवडणुकीला समोरे गेलेले विठ्ठलराव लंघे विजयी झाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचा पराभव झाला आहे. विठ्ठलराव लंघे यांचा 4 हजार 21 मतांनी विजय झाला. बाळासाहेब मुरकुटे यांच्यानंतर लंघे जायंट किलर ठरले आहेत.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शिवसेना (Shivsena) पक्षाचे विठ्ठलराव लंघे आघाडी होते. आमदार शंकरराव गडाख आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मतविभागणी झाली. त्याचा फायदा लंघे यांना झाला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना 95 हजार 21 मते मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांना 90 हजार 489 मते मिळाली. भाजपचे बंडखोर उमेदवार माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी केली होती. त्यांना 35 हजार 23 मते मिळाली.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांना खूप घेरण्याचा प्रयत्न झाला. पण 'मी उद्धवसाहेबांबरोबर', असे म्हणत, शंकरराव ठाम राहिले. नेवासा गडाख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यांना घेरण्याची जबाबदारी महायुतीकडून भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे देण्यात आली. ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली. त्यामुळे इथं शिवसेनाविरुद्ध शिवसेना, अशी लढत झाली.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला इथं उमेदवार आयात करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना शिवसेनेच्या चिन्हांवर लढले. विखेंच्या बळामुळे त्यांनी गडाख यांच्यासमोर चांगलेच आव्हान उभं केले. भाजपचे बंडखोर उमेदवार माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्तीकडून मैदानात होते. यामुळे बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर भाजप पक्षाकडून कारवाई करण्यात आली.
लंघे आणि मुरकुटे यांनी दोघांवर आरोप करताना गडाखांकडून उभे राहिल्याचे आरोप करत होते. विखेंनी लंघेसाठी मतदारसंघात प्रचाराला धुरळा उडवला, तर बच्चू कडू यांनी मुरकुटेंसाठी तीन मिनिटांची सभा घेऊन, व्यासपीठावरून जमिनीवर उडी मारत सत्ता कोणाचीही येऊ, हुकूमत आमचीच, असा इशारा नेवाशातून देत निघून गेले. या तिरंगी लढतीत, गडाखांचे पारडे सुरवातीपासून जड वाटत असताना, लंघे आणि मुरकुटे यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून मिळालेल्या बळामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
बाळासाहेब ऊर्फ दादासाहेब दामोधर मुरकुटे (PHJSP), हरिभाऊ बहिरू चक्रनारायण (BSP), विठ्ठल वकिलराव लंघे (SS), अब्दुल लालाभाई शेख (NCP), पोपट रामभाऊ सरोदे (VBA), शशिकांत भागवत मतकर (RSPS), शंकरराव यशवंतराव गडाख (SSUBT), शरद बाबुराव माघडे (अपक्ष), रामदास रावसाहेब चव्हाण (अपक्ष), गोरक्षनाथ पंढरीनाथ कापसे (अपक्ष), रवीराज तुकाराम गडाख (अपक्ष), सचिन मदनलाल देसरडा (अपक्ष), सचिन प्रभाकर दरंदले (अपक्ष), जगन्नाथ माधव कोराडे (अपक्ष), वसंत पुंजाहारी कांगुने (अपक्ष), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष), अजित बबनराव काळे (अपक्ष), मुकुंद तुकाराम अभंग (अपक्ष), ज्ञानदेव लक्ष्मण कांबळे (अपक्ष), संतोष नानासाहेब काळे (अपक्ष).
2014 मध्ये शंकरराव गडाख यांचा बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचा वचपा शंकरराव गडाख यांनी 2019 मध्ये घेतला. क्रांतीकारी शेतकरी पक्षाची स्थापना करत निवडणुकीला समोरे गेले. एकतर्फी विजय खेचून आणत मुरकुटे यांचा पराभव केला. गडाख यांना 1 लाख 16 हजार 943 मतं घेतली. मुरकुटे यांना 86 हजार 280 मते मिळाली होती. 2014च्या निवडणुकीत मोदी यांची देशभर लाट होती.
या लाटेच्या तडाख्यात मुरकुटे यांना लाॅटरी लागली. मुरकुटे यांनी गडाख यांना 4 हजार 659 मतांच्या फरकाने विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकरराव गडाख यांना 79 हजार 911 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे साहेबराव हरिभाऊ घाडगे पाटील तर चौथ्या क्रमांकावर काँग्रेसचे दिलीप विठ्ठल वाकचौरे होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.