Balasaheb Thorat Loss : थोरातांचा पराभव, चार दशकांचा बुरूज ढासळला

Sangamner Assembly Constituency Result 2024 : संगमनेर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे युवा कार्यकर्ते अमोल खताळ यांच्यात थेट लढत झाली.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSatrkarnama
Published on
Updated on

Sangamner Assembly Constituency Result : काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे दिग्गज नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघात पराभव झाला. चार दशकांपासून ते विधानसभेचे प्रतिनिधीत्व करत होते.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे अमोल खताळ यांनी त्यांचा पराभव केला. बाळासाहेब थोरात यांचा पराभव होताच, विखे समर्थकांकडून त्यांना डिवचण्यास सुरवात झाली आहे. अमोल खताळ यांच्या विजया मागे भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांची पेरणी महत्त्वाची ठरली.

संगमनेरमध्ये मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून अमोल खताळ यांनी आघाडी उघडली होती. ते शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली. त्यामुळे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) पराभवाच्या छायेत कायम राहिले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार अमोल खताळ यांना 1 लाख 11 हजार 495 मते मिळाली. तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना 99 हजार 643 मते मिळाली.

Balasaheb Thorat
Sangram Jagtap Won : झुंजवलं तरी जगतापांची सहज हॅटट्रिक; आता 'वेध' मंत्रीपदाचे!

संगमनेर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा गड ओळखला जातो. हा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत वेगळ्याच वातावरणाने ढवळून निघाला. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी लक्ष घातले. या मतदारसंघातून माजी खासदार विखे यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली होती. तशी भाजप पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती.

Balasaheb Thorat
Ashutosh Kale Won : फडणवीसांच्या नियोजनापुढे कोल्हेंचा संयम; अजितदादांची पेरणी अन् आशुतोष काळेंचा एकतर्फी विजय

माजी खासदार सुजय विखे यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेण्यात सुरवात केली. यातून संगमनेरमध्ये वातावरण ढवळून निघू लागले. तत्पूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील वातावरण निर्मिती केली होती. संगमनेरमध्य दौरे वाढवले होते. एकप्रकारे थोरातांची कोंडीचा प्रयत्न झाला होता. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्याविरोधात आव्हान उभं केले होते. लंके यांच्या बाजूने निर्णायक भूमिका बजावली होती. यातून सुजय विखे यांचा पराभव झाला. हाच वचपा घेण्यासाठी, तसेच विखे लढत असलेल्या शिर्डी मतदारसंघात थोरातांच्या बालेकिल्ल्यातील संगमनेरमधील जवळपास 28 गावांचा समावेश होता. याचा विधानसभेला फटका बसू नये म्हणून, विखे पिता-पुत्रांनी थोरातांची संगमनेरमध्ये कोंडीचा प्रयत्न होता.

सुजय विखेंचे थोरातांवर थेट हल्ले

बाळासाहेब थोरातांवर त्यांचा गड संभाळून राज्याची जबाबदारी होती. हे लक्षात घेऊन त्यांची मुलगी जयश्री थोरात प्रचाराच्या मैदानात उतरल्या. जयश्री थोरातांनी संगमनेर पिंजून काढला. सुजय विखे आपल्या भाषणातून थोरातांवर थेट हल्ले चढवत होते. या हल्ल्यांना जयश्री थोरातांनी संयमाने, परंतु तेवढ्यात चोखपणे उत्तर दिले. परंतु वसंतराव देशमुख यांनी विखे यांच्या धांदरफळ इथल्या सभेत गरळ ओकली. यातून संगमनेरमध्ये उद्रेक झाला. याचे पडसाद राज्यपातळीवर उमटले. भाजपने इथं हिंदुत्वाचा मुद्दा देखील रेटण्याचा प्रयत्न केला.

खताळ हे विखेंचे कट्टर समर्थक

काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात आठ वेळा या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. सुजय विखे यांच्या रेट्यानंतर संगमनेर विधानसभेची जागा महायुतीत भाजपकडे येईल, असे चित्र असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ही जागा गेली. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात युवा कार्यकर्ते अमोल खताळ यांना शिवसेनेने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. खताळ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक, भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला, परंतु त्याआधीच त्यांची उमेदवारीही घोषित झाली होती.

2024 मधील उमेदवार

बाळासाहेब भाऊसाहेब थोरात (INC), सूर्यभान बाबुराव गोरे (BSP), अमोल धोंडीबा खताळ (SS), भागवत धोंडीबा गायकवाड (AIFB), अब्दुलाझीझ अहमदशरीफ वोहरा (VBA), भारत संभाजी भोसले (SAP), शशिकांत विनायक दारोळे (RPI(A)), कालीराम बहिरू पोपळघाट (bns), अविनाश हौशीराम भोर (JHJBRP), प्रदीप विठ्ठल घुले (LSP), योगेश मनोहर सूर्यवंशी (MNS), दत्तात्रय रावसाहेब ढगे (अपक्ष), अजय गणपत भडंगे (अपक्ष).

2019 आणि 2014 मधील राजकीय स्थिती

2019 मध्ये काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांना उमेदवार म्हणून उभे होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या साहेबराव रामचंद्र नवले यांना पराभूत करत विजय मिळवला. बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 25 हजार 380 मतं मिळाली होती, तर साहेबराव रामचंद्र यांना 63 हजार 128 मतं मिळाली होती. त्या वेळी काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवला होता आणि शिवसेनेच्या उमेदवाराची तुलना केली तर काँग्रेसला साधारणतः दुप्पट मतं मिळाली होती. 2014 मध्येही काँग्रेसचे बाळासाहेब थोरातच येथे निवडणुकीत उभे होते. त्यावेळी त्यांचा सामना शिवसेनेच्या अहेर जनार यांच्याशी झाला होता. त्या निवडणुकीतही थोरात यांनी शिवसेना उमेदवाराच्या तुलनेत साधारणतः दुप्पट मतांमध्ये विजय मिळवला होता. संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे, तिथे काँग्रेसने बराच काळ विजय मिळवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com