Chhagan Bhujbal | Uddhav thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : ठाकरेंच्या संपर्कात! पण येवल्यातच भुजबळांसाठी कुणी केली शिवसेनेची दारं बंद?

Chhagan Bhujbal In Ncp : मंत्री भुजबळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात नाराज आहेत. सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यांना नवा मार्ग निवडायचा आहे, असे बोलले जाते.

Sampat Devgire

Nashik News, 22 June : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या राजकीय 'ट्रॅक' बदलण्याच्या मनस्थितीत असलेल्या भुजबळांच्या मार्गात मतदारसंघातील शिवसेना नेत्यांनी नो एन्ट्री चा बोर्ड लावला आहे.

राज्यातील ओबीसी नेते मंत्री भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा होत आहेत. या चर्चांचे तीव्र पडसाद भुजबळांच्या येवला मतदारसंघातील 46 गावांमध्ये उमटले आहेत. येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात लासलगाव येथे माजी आमदार कल्याणराव पाटील आणि शिवा सुरासे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला शेकडो शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी एकमुखाने भुजबळांना शिवसेना ठाकरे गटात ( Shivsena ) प्रवेश देऊ नये, असा निर्धार व्यक्त केला.

मंत्री भुजबळ हे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये द्वेष निर्माण करीत आहेत. मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील-यांच्याविषयी ( Manoj Jarange Patil ) द्वेषपूर्ण विधाने करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडविण्याचे काम त्यांनी केले.

जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम करणाऱ्या भुजबळांना कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत प्रवेश देऊ नये, अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप, उत्तमराव वाघ, विकास रायते, ज्ञानेश्वर तासकर, बापूसाहेब सौंदक, गणपतराव भोसले, किशोर दरेकर, प्रमोद पाटील यांसह शेकडो पदाधिकारी आणि सरपंच उपस्थित होते.

मंत्री भुजबळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात नाराज आहेत. सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यांना नवा मार्ग निवडायचा आहे, असे बोलले जाते. त्यातही आता मोठा ट्विस्ट आला आहे. हा वाढता विरोध भुजबळांची राजकीय कोंडी करण्याची शक्यता आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT