Vanchit Bahujan Aghadi  Sarkarnama
महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aaghadi : 'वंचित बहुजन आघाडी'ची पाचवी उमेदवार यादी जाहीर; दहा मतदारसंघांचा समावेश!

Vanchit Bahujan Aaghadi declare fifth list of candidates : निलेश सांबरे भिवंडी लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल.

Mayur Ratnaparkhe

Loksabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमधून 10 मतदारसंघामध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा केली गेली आहे. एकीकडे महाविकास आघाडी तसेच महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अद्यापही काही जागांवरून ओढातान सुरू असताना, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभरात उमेदवार देण्याचा धडका सुरू आहे.

'वंचित'च्या पाचव्या यादीत 'या' उमेदवारांचा समावेश -

रायगड -कुमुदिनी रवींद्र चव्हाण, धाराशीव - भाऊसाहेब आंदळकर, नंदुरबार - हनुमंत कुमार सुर्यवंशी, जळगाव - प्रफुल कुमार लोढा, दिंडोरी- गुलाब मोहन बर्डे, पालघर - विजया म्हात्रे, भिवंडी - निलेश सांबरे, मुंबई उत्तर - बिना रामकुबेर सिंग, मुंबई उत्तर (पश्चिम) - ॲड. संजीवकुमार कलकोरी, मुंबई दक्षिण(मध्य) - अबुल हसन खान

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निलेश सांबरे भिवंडी लोकसभा मतदारसंघातुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल. जिजाऊ संघटनेकडून पालघरमध्ये उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमिताने सर्वत्र प्रचार शिगेला पोचला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकाला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश (Prakash Ambedkar)आंबेडकर यांनी यवतमाळच्या वणी येथील प्रचार सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

तसेच,मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT