Kalyan-Dombivli Civic Politics: Varun Sardesai Meets Raju Patil sarkarnama
महाराष्ट्र

KDMC Politics : मुंबईआधी 'या' महापालिकेत ठाकरे बंधूंच ठरलं! सरदेसाई-पाटील भेटीने नवीन समीकरणाची नांदी!

Varun Sardesai Meets Raju Pati : कल्याण डोंबिवली महापालिकेत ठाकरे बंधूंची युती होण्याची शक्यता आहे. आमदार वरुण सरदेसाई यांनी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची भेट घेतल्याने नवी समीकरण जुळल्याची चर्चा आहे.

शर्मिला वाळुंज

KDMC News : आगामी कल्याण–डोंबिवली–ठाणे महापालिका निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी स्थानिक राजकारणातील हालचालही तीव्र होत चालली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वर्चस्वाची लढाई रंगत असतानाच, दुसरीकडे विरोधी राजकारणाची नवी मांडणी आकार घेत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी कल्याण–डोंबिवलीत केलेला दौरा आणि मनसे नेते राजू पाटील यांच्याशी झालेली भेट ही केवळ औपचारिक घटना नसून, महापालिका राजकारणातील संभाव्य समीकरणांची नांदी ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या आधी कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे सांगितले जात आहे.

आमदार वरूण सरदेसाई यांनी बुधवारी दिवा कल्याण डोंबिवली परिसराचा दौरा केला. कल्याण–डोंबिवली परिसरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेतला. मात्र या दौर्‍यात त्यांनी मनसेचे नेते राजू पाटील यांची कार्यालयात जाऊन घेतलेली भेट ही केवळ शिष्टाचारापुरती नसून, आगामी महापालिका रणधुमाळीसाठी राजकीय संकेत देणारी ठरल्याचे मानले जात आहे.

सरदेसाई यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसैनिकांशी संवाद साधला. परत जाताना राजू दादांची भेट झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर राज्यभरात मराठी माणसाची जी एकजूट दिसून येते आहे, तीच ताकद कल्याण–डोंबिवली आणि मुंबईतही उभी राहावी, ही आमची इच्छा आहे. येत्या काळात दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र बसून याबाबत सविस्तर चर्चा करतील.”

कल्याण–डोंबिवलीत मनसेला मानणारा मतदारवर्ग मोठ्या प्रमाणावर असून, शिवसेनेचीही येथे परंपरागत ताकद आहे. २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांचा दाखला देत सरदेसाई यांनी सांगितले की, दोन्ही ठाकरे बंधूंना मानणारा, प्रेम करणारा वर्ग येथे मोठ्या संख्येने आहे. “एकत्र आलो, तर ही ताकद निश्चितच प्रभावीपणे दिसून येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठाकरेंची एकजुट गळती रोखणार

कल्याण–डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वर्चस्वासाठी चुरस वाढत असताना, दुसरीकडे मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच या पक्षांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी ठाकरे बंधूंच्या एकजुटीवर आधारित संघटनात्मक बांधणी मनसे ठाकरे गटाकडून सुरू आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT