Ajit Pawar Saarkarnama
विदर्भ

Ajit Pawar : अमरावती आयुक्तांची अजितदादांनी घेतली फिरकी; म्हणाले, 'यापूर्वी तुम्ही...'

Amar Ghatare

Amaravati Political News : अमरावती महानरपालिकेने तब्बल 200 टक्क्यांनी करवाढ केली आहे. याविरोधात लोकांसह सर्व राजकीय पक्षांनी आवाज उठवला आहे. यावर शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयुक्तांची चांगलीच फिरकी घेतली. तसेच पालिकेच्या माध्यमातून शहरातील समस्या सोडवण्याच्या सूचनाही केल्या.

अमरावती येथे आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्त आलेल्या अजित पवारांनी नागरिकांशी संवाद साधला. आपण नागपुरात आलो त्या वेळीच अमरावतीला जायचे आहे. असा पक्का निश्चय केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, त्यांनी शहरात वाढलेल्या कराचा मुद्दा छेडत आयुक्तांना धारेवर धरले.

अजित पवारांनी महापालिका आयुक्तांना 'तुम्ही आधी कुठं होता..' असा तिरकस प्रश्न विचारला. तसेच अमरावतीकरांच्या समस्यांची जाणीव करून दिली. महापालिकेने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

सध्या महापालिक बरखास्त असून येथे प्रशासक राज सुरू आहे. दरम्यान, अनेक वर्षे आमरावतीमध्ये करवाढ झाली नव्हती. यातच आमरावती महापालिकेचे आयुक्त देविदास पवारांनी अचनाकच दोनशे टक्के करवाढ केली. करवाढीला नागरिकांसह सर्वपक्षिय नेत्यांचाही विरोध आहे. त्यामुळे अमरामतील वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या पश्चिम विदर्भातील आकोला आणि अमरावतीमध्ये कारवाढीविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत.

यावेळी पवारांनी, 'जिथे विकास होतो त्याठिकाणी पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळाले पाहिजे. पिण्याच्या पाण्याची समस्या अलीकडच्या काळात मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अमरावती महापालिकेने शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ते नियोजन केले पाहिजे, अशी सूचनाही पवार यांनी केली. अमरावती शहरात वाढलेल्या मालमत्ता करासंदर्भात मनपाने अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी दिला. कराच्या संदर्भात अमरावतीमधून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. त्यामुळे चर्चेतून यावर तोडगा निघाला पाहिजे,' अशी सूचना अजित पवार यांनी केली.

अमरावतीमधील आपल्या भाषणादरम्यान पवारांनी राजकीय आरोप-प्रत्यारोप करणे टाळले. माजी मंत्री नवाब मलिकांवर विचारले असता त्यांनी सावध भूमिका घेत राजकीय विषयावर भाष्य करणे टाळले. राज्य विधिमंडळाचा हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असल्याने अमरावती जिल्ह्यासाठी कोणतीही मोठी घोषणा पवारांनी केली नाही.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT