Lok Sabha Election 2024 : पश्चिम विदर्भातील नामवंत अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून ओळख असलेले डॉ. अभय पाटील हे अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधील संभाव्य उमेदवारांच्या यादीत सर्वांत वरच्या क्रमांकावर आहेत. त्यांचे वडील डॉ. के. एस. पाटील विश्व हिंदू परिषदेत सक्रिय होते. डॉ. अभय पाटील सध्या काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी ‘मराठा कार्ड’ वापरण्याची रणनिती काँग्रेसने आखली आहे. त्यानुसार छावा संघटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय झालेले डॉ. अभय पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची तयारी सुरू झाली आहे. शासकीय सेवेचा त्यांचा राजीनामा सरकारने न स्वीकारल्यामुळे, त्यांना 2019 ची लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती. (Latest Marathi News)
डॉ. पाटील अकोला लोकसभेसाठी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असल्याचे बोलले जाते. कधीकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसची परिस्थिती बिकट आहे. या मतदारसंघात 1951 ते 1984 पर्यंत सलग 12 वेळा कॉंग्रेसने प्रतिनिधीत्व केले. 1989 मधील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला जोरदार धक्का देत पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांनी विजय मिळविला. त्यानंतर सलग तीनदा फुंडकर या मतदारसंघातून विजयी झाले.
1998, 1999 मधील निवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकर विजयी झाले होते. त्यानंतर खासदार संजय धोत्रे यांनी विजयाची हॅट्ट्रिक करत दोन दशकांपासून या मतदारसंघावर मजबूत पकड निर्माण केली. भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या या मतदारसंघात आगामी निवडणुकीत कॉंग्रेसकडे सक्षम चेहरा नसला, तरी भाजप या मतदारसंघात सातत्याने ‘मराठा कार्ड’ वापरत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस देखील ‘मराठा कार्ड’ वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉ. अभय पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने डॉ. पाटील यांना मैदानात उतरविल्यास भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. डॉ. अभय पाटील यांनी 2024 मधील लोकसभा निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून जिल्ह्यातील संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात सुरुवात केली. त्यांनी जिल्हाभरात भेटीगाठी आणि दौरे वाढविले. मराठा मोर्चाच्या समन्वयकांपैकी एक असलेल्या डॉ. पाटील यांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशातील लोकांचा कल काँग्रेसकडे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे वळल्याचा दावा करण्यात येत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसकडे उच्चविद्याविभूषित, सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले, वैद्यकीय क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रांत निपुण असलेले डॉ. अभय पाटील यांच्यासारखा प्रभावी व दमदार चेहरा असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. अभय काशिनाथ पाटील
20 जानेवारी 1965
एमबीबीएस (डी. ऑर्थो), एफसीपीएस (डी. ऑर्थो)
वडील डॉ. काशिनाथ श्रीपतराव पाटील विदर्भातील पहिले ऑर्थोपेडिक सर्जन होते. आई कमलबाई काशिनाथ पाटील या गृहिणी आहेत. त्यांच्या पत्नी रेखा या डॉक्टर असून, दोन्ही मुले अचित्य पाटील, आणि गार्गी पाटील हेही डॉक्टर आहेत.
डॉ. अभय पाटील हे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. यापूर्वी ते शासकीय सेवेतही होते.
अकोला
काँग्रेस
डॉ. अभय पाटील यांनी अद्याप निवडणूक लढविलेली नाही.
डॉ. अभय पाटील हे धार्मिक वृत्तीचे आहेत. ते अकोल्यातील प्रत्येक धार्मिक उत्सवात नेहमी सहभागी होत असतात. त्यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना मदत केली आहे. गावागावांत त्यांनी वैद्यकीय शिबिरे घेऊन रुग्णसेवा केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. अकोल्यातील ऐतिहासिक कावड महोत्सव, गुढीपाडवा उत्सव आदी धार्मिक-सामाजिक उपक्रमात ते नेहमी सहभागी होत असतात. त्यांच्या वक्तृत्वशैलीची तरुणांना भुरळ आहे. रोखठोक भूमिका मांडणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मराठा क्रांती मोर्चात त्यांनी झोकून देऊन काम केले. मराठा क्रांती मोर्चाचे ते समन्वयक आहेत.
डॉ. अभय पाटील यांनी अद्याप निवडणूक लढवली नाही.
निवडणूक लढवली नव्हती.
डॉ. अभय पाटील यांनी निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने जनसंपर्क दौऱ्यांना सुरुवात केली आहे. जनसंपर्क दौऱ्यांच्या माध्यमातून ते युवकांना मार्गदर्शन करत आहेत. लोकांच्या भेटीगाठी, धार्मिक, सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग पूर्वीपेक्षा वाढला आहे.
डॉ. पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, आपल्या जनसंपर्क दौऱ्यांची माहिती, नेत्यांची भाषणे, मेळावे याची माहिती पाटील आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवरून देत असतात. अकोला जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील घडामोडी, कार्यक्रमांमधील सहभाग यांची माहिती, छायाचित्रे, व्हिडीओही ते दररोज त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून आणि ट्विटर हॅन्डलवर पोस्ट करतात.
डॉ. अभय पाटील हे फारशी राजकीय वक्तव्ये करत नाहीत. डॉ. पाटील यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात मोठे वाद, चुकीची विधाने असे प्रसंग क्वचितच ऐकायला मिळतात. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदमध्ये दोन पदाधिकाऱ्यांचा शाब्दिक वाद पाहायला मिळाला. माजी महापौर मदन भरगड आणि डॉ. अभय पाटील यांच्यातील हा वाद होता. माजीमंत्री अजहर हुसेन यांच्या समोरच हा वाद झाला. या वादात एकमेकांना पाहून घेण्याची भाषादेखील झाली होती. डॉ. अभय पाटील यांनी हा वाद सुरू असताना त्यांच्या वाहनातून पिस्तुल काढल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या वादाची सखोल चौकशी केली. डॉ. पाटील व भरगड या दोघांनाही काँग्रेसने नोटीस बजावली होती.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात.
उच्च विद्याविभूषित, भाषेवर प्रभुत्व आणि दांडगा जनसंपर्क या डॉ. पाटील यांच्या जमेच्या बाजू आहे. प्रत्येकाच्या सुख, दु:खात मदतीला धावून जातात. वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे नाव आहे. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी लागणारे आर्थिक बळही त्यांच्याजवळ आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. अभय पाटील पक्षात सक्रिय होत असल्याचा सातत्याने आरोप होतो. अकोला काँग्रेसमधील गटबाजी प्रदेश काँग्रेससाठी डोकेदुखी ठरली आहे. पक्षात अनेक गट-तट आहेत. डॉ. पाटील हे मुळात राजकारणी नाहीत, ते डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना पक्षांतर्गत विरोध आहे. डॉ. पाटील पक्षाच्या कामात सक्रिय झाले की अन्य स्थानिक नेते, पदाधिकारी दूर जातात. या गटबाजीचा फटकाही डॉ. अभय पाटील यांना बसू शकतो.
2019 मधील लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या विरोधात ‘मराठा कार्ड’ म्हणून काँग्रेस डॉ. अभय पाटील यांचे नाव पुढे करू शकते. त्यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता तेवढी शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर हेही निवडणूक लढवणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचा केंद्रीयस्तरावर ‘इंडिया’ आघाडीत व महाराष्ट्रात महाविकास आघाडीत प्रवेशाच्या हालचाली सुरू आहेत. असे झाल्यास ‘वंचित’ अकोला मतदार संघावर दावा करेल. त्यामुळे काँग्रेसने सध्या डॉ. अभय पाटील यांना पूर्णपणे ‘ग्रीन सिग्नल’ दिलेला नाही.
काँग्रेसने तटस्थ यंत्रणांमार्फत केलेल्या अनेक सर्वेक्षणांत भाजपच्या उमेदवाराला तगडी टक्कर देण्याची सर्वाधिक क्षमता डॉ. अभय पाटील यांच्यात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. डॉ. अभय पाटील यापूर्वी शासकीय सेवेत होते. त्यांनी आपला राजीनामा दिलेला होता. तेव्हाच्या राज्य सरकारने अखेरपर्यंत डॉ. अभय पाटील यांचा राजीनामा स्वीकारला नाही. त्यामुळे काँग्रेसला आपला उमेदवार बदलावा लागला होता. राजीनामा वेळेत मंजूर न झाल्याने काँग्रेसकडून नाईलाजाने 2019 मध्ये डॉ. अभय पाटील यांच्याऐवजी हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडे डॉ. अभय पाटील यांच्या नावाने सक्षम चेहरा असल्याचे सांगण्यात येते. उमेदवारी नाही मिळाली तरी ते बंडखोरी करण्याची शक्यता कमीच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.