Sharad Pawar-Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh : 'महायुतीतून नाही तर अजितदादा स्वबळावर लढणार', शरद पवारांच्या विश्वासू नेत्याने वर्तवला अंदाज

Assembly Election 2024 Anil Deshmukh Ajit Pawar : महायुतीच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांना आणि शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्यांना परत घ्यायचे नाही असा निर्णय आधीच झाला आहे, असे अनिल देशमुख म्हणाले

Rajesh Charpe

Anil Deshmukh News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुती एकत्रित लढणार असल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी जागा वाटपाच्या समोर आलेल्या सूत्रानुसार सर्वात कमी जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. त्यामुळे ते स्वतंत्रपणे लढतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी यांनी सुद्धा अजितदादा हे महायुतीतून नाही तर वेगळे लढतील अशी शक्यता वर्तविली आहे. देशमुख म्हणाले, कमी जागा देऊन त्यांनी वेगळे लढावे असा संदेश या माध्यमातून भाजपने त्यांना दिला असल्याची शंका आहे.

अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक नेते पुन्हा शरद पवार यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश आहे, असा प्रश्न पत्रकरांनी अनिल देशमुख यांना विचारला त्यावर देशमुख म्हणाले, महायुतीच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांना आणि शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्यांना परत घ्यायचे नाही असा निर्णय आधीच झाला आहे. त्यामुळे भेटीगाठी घेतल्या म्हणून ते पक्षात परत येतील, असा त्याचा अर्थ होत नाही.

जागा वाटपासाठी तीन दिवस बैठका

अजित पवार यांच्यासोबत असलेल्या पहिल्या एक ते दहा नेत्यांच्या नावावर आधीच फुली मारून ठेवण्यात आली आहे, असे देशमुख यांनी सांगत महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. 7, 8 आणि, 9 ऑक्टोबरला मुंबईत बैठका होणार आहेत. त्यानंतर जागा वाटपाची आकडेवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले.

मतदारसंघांची अदलाबदल होणार

महाविकास आघाडीत सर्व भाऊ सारखेच आहेत. लहान,मोठा वाद नाही. कोणाचा मतदारसंघ, कुठल्या पक्षाचा दावा यापेक्षा निवडूण येण्याची कुठल्या पक्षाची, उमेदवाराची दाट शक्यता यानुसार जागा वाटप करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे काही मतदारसंघाची अदलाबदील होऊ शकते. यात विदर्भातीलसुद्धा काही जागांचा समावेश राहू शकतो, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

एमआयएमचा प्रस्ताव नाही

महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्यानंतर आमचे नेते एकत्रित बसून मुख्यमंत्री कोणाला करायचे याचा निर्णय घेतील. यावेळी त्यांनी एमआयएमने आमच्याकडे प्रस्ताव दिला नाही, प्रकाश आंबेडकर सोबत आले तर विचार केला जाईल असे देशमुख यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT