Vinayak Raut : विनायक राउतांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांची दांडी; ठाकरे गटाची परिस्थिती सचिवांसमोर उघड

Political News : माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यक्रमाकडे शिवसैनिकांनीच पाठ फिरवल्याचे चित्र होते. केवळ 50 ते 80 च कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
Vinayak Raut News
Vinayak Raut News Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. ठाकरे गटाचे मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. त्या अनुषंगाने कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत कोल्हापुरात आले होते.

भर चौकात हा कार्यक्रम आयोजित केल्याने या मतदारसंघात शिवसैनिकांची तोबा गर्दी होईल, अशी आशा शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना होती. मात्र विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या कार्यक्रमाकडे शिवसैनिकांनीच पाठ फिरवल्याचे चित्र होते. केवळ 50 ते 80 च कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. (Vinayak Raut News)

पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर उत्तरवर दावा सांगितला असला तरी, या कार्यक्रमासाठी गर्दी जमवून आपली ताकद दाखवण्याची नामी संधी चालून आली होती. मात्र गर्दीचे श्रेय इतर पदाधिकारी घेतील, याच शंकेने शिवसैनिकांची गर्दी कमी दिसली की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटात अंतर्गत मतभेद यापूर्वी चव्हाट्यावर आले आहेत. अशातच आठवडाभरापूर्वी ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनी मातोश्रीवर जाऊन कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा आपल्याकडे घ्यावा, अशी विनंती केली. या मतदारसंघावर दावा करत असताना ठाकरे गटातील तीन पदाधिकाऱ्यांमध्येच चांगली ईर्षा रंगत आहे.

Vinayak Raut News
Jalna News : जालन्यातील मेडिकल कॉलेजवरून गोरंट्याल, खोतकरांमध्ये खडाजंगी

शिवसेनेचे उपनेते संजय पवार, माजी जिल्हाध्यक्ष विजय देवणे आणि शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी या उत्तरमधून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अंतर्गत कुरघोडीचे ग्रहण लागले असताना मतदारसंघ ठाकरे गटाकडे घेण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तो कोणत्या मुद्द्यावर घेता येणार? अशी शंका आज झालेल्या गर्दीच्या उपस्थितीवरून निर्माण झाली आहे.

वास्तविक पाहता पक्षाचे सचिव विनायक राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांना या तीन पदाधिकाऱ्यांनी आपली ताकद दाखवण्याची गरज होती. मात्र, तसे झाले नाही. केवळ 50 ते 80 शिवसैनिक या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. जर एखाद्या पदाधिकाऱ्याने गर्दी जमवली तर त्याचा फायदा आयत्या पदाधिकाऱ्यांना होऊ नये याचीही काळजी इच्छुक पदाधिकाऱ्यांनी घेतलेली दिसते.

Vinayak Raut News
Mahayuti: बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीची खेळी; निवडणुकीपूर्वीच 'त्या' 12 आमदारांची नियुक्ती होणार

इतकंच नव्हे तर अनेक पदाधिकाऱ्यांना ही जागा काँग्रेसला गेल्याची कुणकुण लागली आहे. त्यामुळे अनेकांनी शिवसैनिकांना बोलवण्यात हात आखडले आहेत की काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. पण त्याचा फटका प्रमुख नेत्यांच्या कार्यक्रमांना बसत आहे. पक्षाचे सचिव विनायक राऊत यांना भर चौकात केवळ 50 ते 80 कार्यकर्त्यांसमोर कार्यक्रम घ्यावा लागला. ही शोकांतिका म्हणावी लागेल.

एकीकडे मातोश्रीवर जाऊन कोल्हापूर उत्तर आपल्याकडे घेण्यासाठी विनंती करायची तर दुसरीकडे कार्यक्रमाला व्यासपीठापर्यंत आणण्यास अपयशी व्हायचं. हीच परिस्थिती शिवसेना ठाकरे गटाची कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आहे. केवळ अस्तित्व दाखवण्यासाठीच शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन आणि कार्यक्रम होतात की काय हे आजच्या कार्यक्रमावरून सवाल उपस्थित होत आहेत.

Vinayak Raut News
Prakash Shendge : आदिवासींचे आम्हाला काही नको; पण बारामतीसुद्धा राखीव होईल : धनगर नेत्याने मांडली भूमिका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com