Ashok Chavan Sarkarnama
विदर्भ

Ashok Chavan: नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयाचा प्रश्न अधिवेशनात गाजला...

Nanded Hospital Death : आरोग्य यंत्रनेतील रिक्त पदे भरा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची मागणी

Laxmikant Mule

Nanded News : नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयात व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला आहे. आरोग्य यंत्रनेतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आशा घटना राज्यात पुन्हा घडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या २४ रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची घटना सुमारे दोन महिन्यांपूर्वी झाल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या घटनेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय‌ व‌ वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय साधने सुविधा, औषधांचा तुटवडा, रिक्त पदे या बाबत राज्यभर खूप मोठी चर्चा झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रुग्णालयाला सर्च राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, मंत्री यांनी भेटी देऊन घटनेची तातडीने चौकशी करून आरोग्य सेवा सुधारणारेची मागणी केली होती. या रुग्णालयात ४६१ पदें मंजूर असून त्यापैकी ११७ रिक्त आहेत. तसेच औषध तुटवडा, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्याने वैद्यकीय चाचण्या केल्या जात नाहीत, रुग्णालयात परिसरातील दुर्गंधी या बाबत वारंवार तक्रारी केल्या जातात.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता ११) वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २ ऑक्टोबर रोजी २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत रुग्णसेवेतील अव्यवस्थेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले.

आरोग्य सेवा हा विषय गांभिर्याने व प्राधान्याने हाताळण्याची आवश्यकता आहे. रुग्णसेवेसाठी मोठी गुंतवणूक केली जाते. पदे रिक्त राहून त्याचा योग्य उपयोग होणार नाही. घटना घडल्यानंतर मंत्री येतात, पालकमंत्री येतात आणि कालांतराने सारे शांत होते.

हे टाळले पाहिजे व नांदेडसारख्या घटना राज्यात पुन्हा घडणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडली व राज्यभरातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची रुग्णालये तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयांमधील रिक्त पदे तातडीने भरण्याची व इतर सेवा-सुविधा सक्षम करण्याची मागणी यावेळी राज्य सरकारकडे केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT