Mahavikas Aghadi | Mahayuti  Sarkarnama
विदर्भ

Mahavikas Aghadi News : अधिवेशन संपत आले तरीही ना विरोधी पक्षनेता ठरला, ना काँग्रेसचा गटनेता!

Mahavikas Aghadi and Assembly session : विरोधकांच्यावतीने नावच देण्यात आले नाही तर कोणाची निवड करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Rajesh Charpe

Nagpur Winter Session 2024 : महायुतीचे पहिले हिवाळी अधिवेशन बिनखात्यांच्या मंत्र्यांशिवाय आणि विरोधी पक्षनेता व काँग्रेसच्या गट नेत्याशिवायच पार पडणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्यावतीने अद्याप विरोधी पक्षनेता म्हणून कोणाच्या नावाचा प्रस्ताव विधासभा अध्यक्षांकडे सादर केलेला नाही. दुसरीकडे काँग्रेसचेसुद्धा गटनेत्याच्या नावावर अद्याप एकमत झालेले नाही.

हिवाळी अधिवेशनाचे आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. विरोधकांकडे एकूण आमदारांच्या दहा टक्के संख्या नसल्याने विरोधी पक्षनेता होणार नाही अशी चर्चा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून सुरू आहे. मात्र दहा टक्क्यांचा काही नियम नाही, ज्या पक्षाकडे सर्वाधिक आमदारांची संख्या आहे त्यांना विरोधी पक्षनेतेपद देता येते असा नियम असल्याचे सांगण्यात येते. याकरिता विधानसभा अध्यक्षांची फक्त मंजुरी आवश्यक असते.

या नियमानुसार विरोधकांमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडे सर्वाधिक २० त्या खालोखाल काँग्रेस १६ आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडे १० आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे गट विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना(Shivsena) दावा करेल असे सांगण्यात येत होते. मात्र विधानसभा अध्यक्षांकडे कोणीच अद्याप विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला नसल्याचे समोर आले आहे. या पदासाठी अध्यक्षांकडे अर्ज करण्याची प्रथा-परंपरा नाही. मात्र विरोधकांकडून एक नेत्याचे नाव कळवणे अपेक्षित असते. ते अद्याप कळवण्यात आले नाही.

विरोधकांच्यावतीने नावच देण्यात आले नाही तर कोणाची निवड करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभेच्या(Vidhansabha) अध्यक्षांकडे अद्याप कोणाच्याच नावाची शिफारस करण्यात आली नसल्याचे समजते. हे बघता आणि आणि अधिवेशनाला शिल्लक राहिलेला कलावधी पाहता सध्यातरी विरोधी पक्षनेत्याची घोषणा होणार नाही असे दिसते.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी अधिवेशनात तुम्हाला काँग्रेसचा गटनेता दिसेल असा दावा केला होता. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी १७ डिसेंबरला नागपूरला येऊन गेले. त्यांनी आमदार-खासदारांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. यालाही दोन दिवस उलटून गेले. मात्र काँग्रेसने गटनेत्याचे नाव जाहीर केलेले नाही. चेन्निथाला यांच्या बैठकीत काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलासोबत कोणाला प्रदेशाध्यक्ष करायचे यावरही चर्चा झाली आहे. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यांनासुद्धा विधानसभेत काँग्रेसचा गटनेता व्हायचे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT