Devendra Fadnavis-Vijay Wadettivar Sarkarnama
विदर्भ

Assembly Winter Session : वडेट्टीवारांच्या शेतकऱ्यांवरील प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा...

Vijaykumar Dudhale

Nagpur News : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण अधिवेनात होणाऱ्या कामाची चुणूक दिसली. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. राज्यातील शेतकरी संकटात आहे, सरकार त्यांना मदत करण्याऐवजी हात वर करत आहे, असा आरोप केला. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर देताना विरोधी पक्षनेत्यांकडे अपुरी माहिती आहे. दुष्काळी तालुक्यांना जी मदत दिली जाणार आहे, तीच मुदत दुष्काळसृदश तालुक्यांनाही दिली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी विधानसभेत केली. (Fadnavis's big announcement in the assembly while answering farmers' question of Wadettivar...)

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. सरकारने हात वर केले, असा आरेप वडेट्टीवार यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वडेट्टीवार म्हणाले की, अवकाळी पावसाने राज्यातील २२ जिल्ह्यांतील कापूस, संत्रा, धान, कांदा यांचे मोठे नुकसान झाले आहे. उपसमितीची बैठक झाली, मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव नाही. टंचाईसदृश परिस्थिती असा सरकारकडून नवीन शब्दप्रयोग करण्यात आला. त्यामध्ये आठ उपययोजना करण्यात आल्या. महसूल, वीजबिलात सूट, रोहयो कामाच्या निकषात बदल, कर्जाचे पुनर्गठण असे नेहमीचे उपाय केले आहेत; पण शेतकऱ्यांना मदत करताना मात्र सरकारने हात वर केले आहेत. शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही.

चक्री वादळ आणि अवकाळी पावसाचा फटका राज्यातील २२ तालुक्यांना बसलेला आहे. शेतकरी पूर्णतः उद्‌ध्वस्त झाले आहेत. सरसकट शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती. मात्र, तसे झालेले नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची गरज आहे. आत्महत्यांमुळे सरकारपुढे चिंता वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची आम्ही पाहणी केली, त्यानंतर सरकारचे मंत्री त्या नुकसानग्रस्त भागात गेले होते. तोपर्यंत कोणीही गेलं नव्हतं. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री जातील, अशी आम्हाला अपेक्षा हाेती. मात्र, मुख्यमंत्री प्रचारात गुंतले होते, असा आरोपही त्यांनी केला.

विरोधी पक्षनेत्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही. केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे राज्यातील ४० तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले आहेत. ते निकषात बसत नाहीत, पण नुकसान झाले आहे. राज्य सरकारने सांगितले, की आम्ही त्यांना आमच्या पैशातून मदत करू. याशिवाय आपण १२०० मंडलांना दुष्काळसदृश घोषित केली आहेत. जी मदत दुष्काळी तालुक्यांना मिळणार आहे, तीच मदत आणि सवलती दुष्काळसदृश तालुक्यांनाही मिळणार आहे. यामध्ये आम्ही कुठेही भेदभाव करणार नाही, अशी घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे. मुख्यमंत्री मागील वर्षी दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच २० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांवर पीकविम्याची अग्रिम रक्कम दिली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीठ अथवा अवकाळी असो. कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची भरपाई आम्ही देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

मागील वर्षी एनडीआरएफच्या दुप्पट मदत दिली आहे. महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना मदत करेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT