yogesh datkar sarkarnama
विदर्भ

Shivsena UBT : ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल; कारण काय?

Akola News : अकोल्यातील जिल्हापरिषद सदस्य आणि शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुखावर अ‍ॅट्रोसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

- योगेश फरपट

Akola News : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्यावर अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. हिंगणी बु. येथील महिला सरपंचाने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील हिंगणी बु. येथील ग्रामपंचायतच्या महिला सरपंचांना गोपाल दातकर यांनी ग्रामपंचायतमधून नमुना आठची मागणी केली होती. तो न दिल्याने त्यांनी तक्रारकर्त्या महिला सरपंच यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

जिल्हा परिषदेच्या ( Akola Zp ) आवारात कर्मचाऱ्यांसमोर ही घटना घडली होती. प्राप्त तक्रारीवरून शहरातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिवसेना ( Shivsena ) जिल्हाप्रमुख तथा जिल्हापरिषद गटनेते गोपाल दातकर यांनी म्हटलं, "हिंगणी बु. ग्रा.प.अंतर्गत ओबीसीचे घरकुल मंजुरीसाठीच्या लाभार्थ्यांनी नमुना आठ ‘अ’ची ग्रामसभेत मागणी केली होती. मात्र, नमुना '8' न मिळाल्याने ही बाब गट विकास अधिकाऱ्यांना सांगितली. दोन वेळा पत्रही दिले. पण, नमुना '8' न मिळाल्याने मुख्याधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र मुख्याधिकारी नव्हत्या. याठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बांगर, गट विकास अधिकारी रुद्रकार, सह. गटविकास अधिकारी परिहार हेही होते. सरपंचही तेथे आल्या."

"त्यांनी नमुना '8' देण्यास नकार दिला. सरपंच यांना भाजपचे सहकार्य असून, दबावात येऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मी जातीवाचक शिविगाळ केली नसून, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असं गोपाल दातकर यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT